web-banner-lshep2024

Breaking News

अतिवृष्टीच्या अनुषंगाने उद्या शाळेंना सुट्टी जाहिर

गौरव शेलार / मुरबाड ,ठाणे : जिल्हयात सद्यास्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इयत्त 1ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते.

याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील सर्व शाळांना दिनांक 18/08/2025 व दिनांक 19/08/2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे परिपत्रक ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी जारी केले आहे.

No comments