जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्याचा केला दौरा;विविध विकासकामांवर चर्चा..
गौरव शेलार / मुरबाड , ठाणे : ठाणे जिल्हयाचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी अचानक मुरबाड तालुक्याकडे पाहणी द्वौरा केला आहे.विशेषतः रविवारी सुट्टी असताना त्यांचा पाहणी द्वौरा चर्चेत राहिला आहे.पहिल्यांदाच त्यांनी मुरबाड तालुक्याला सदिच्छा भेट दिली असून मुरबाड तहसिलदार कार्यालयालाही त्यांनी भेट दिली.यावेळी त्यांचे मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी सहर्ष स्वागत केले.
यानंतर ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सर्व विभागासह व्यायामविभागाची पाहणी केली.यावेळी हातांनी घडवलेलं,निसर्गाशी जोडलेलं आदिवासी बांबू बहु उपायोगी वस्तु ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांना मुरबाड तहसिलदार देशमुख यांनी भेट देऊन या कार्यालयाच्या कामकाजाची माहितीही तहसिलदार यांनी दिली.यावेळी नायब तहसिलदार शिंदे यांच्यासह अधिकारी,तलाठी मंडळाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यानंतर मुरबाड तालुक्याच्या भौगौलिक व नैसर्गिक पर्यटन असलेल्या माळशेज घाटाकडे ठाणे जिल्हाधिकारी यांनी प्रस्थान केले.
या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील निसर्गसंपन्न आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या काळू धबधब्याला प्रथमच भेट दिली. स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काळू धबधबा, निसर्ग पर्यटनाची अपार शक्यता असलेले ठिकाण असून त्याच्या समतोल आणि शाश्वत विकासासाठी प्रशासकीय सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे.या भेटीदरम्यान थितबी येथील वन विभागाच्या रिसॉर्टवर जिल्हाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक स्वागत करण्यात आले.
मतदार संघातील विविध विकासकामे, पर्यटन विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरी सुविधा या विषयांवर चर्चा झाली असल्याचे मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी युवा महाराष्ट्र लाइवशी बोलताना सांगितले.



No comments