विद्यार्थ्यांनी आवडीचे शिक्षण आपल्या देशातच घ्यावे - प्रदीप साळवी
नामदेव शेलार / मुरबाड : विद्यार्थ्यांनी आपल्याला आवड असेल त्याचं शिक्षण घ्यावे जिद्द चिकाटीने अभ्यास करावा नापास होण्याचे भय मनातून काढून टाकावे असे अहवाल आगरी सेनेचे नेते प्रदीप साळवी यांनी मुरबाड तालुका आगरी सेना विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळ्यात केले आहे मुरबाड तालुका आगरी सेना तर्फे एमआयडीसी हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थी आगरी समाज रत्नांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगरी सेनेचे नेते प्रदीप साळवी मंगल शेलार चंद्रकांत ठाणकर नारायण अंदाडे संजय फुलोरे लहू डोंगरे दीपक खाटेकरे पांडुरंग शिंगोळे हरीश टेकडे अन्य मान्यवरांच्या हस्ते 300 शालेय विद्यार्थी आगरी समाज रत्नांचा सन्मान करण्यात आला यावेळी नितेश डोंगरे लिखित चला दंगल पाहूया या पटनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या मुलांनी शिक्षणात भरारी घेतली आहे सर्व क्षेत्रात यश मिळवला आहे जमिनी विकून परदेशात शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या देशात शिक्षण घ्यावे देशातील नेत्यांनी भारतात शिक्षण घेऊन क्रांती घडवली आहे परदेशातील विद्यार्थी कृषी क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी भारतात येतात आपली मुले परदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी जातात परतल्यावर भारतातील परीक्षेत नापास होतात त्यामुळे भारतातील शिक्षण उत्तम आहे असेही प्रदीप साळवी यांनी मार्गदर्शनात सांगितले.
परदेशात शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी मायदेशी परतत नाहीत आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी योगदान दिलं पाहिजे जमिनी विकू नका ग्रामीण भागात परप्रांती यांचे फार्म हाऊस जाळे पसरला आहे असे सांगून काही वर्षांपूर्वी आगरी कोळी यांच्या जमिनीवर आरक्षण टाकले त्यावेळी तात्कालीन आपल्या नेत्यांनी आवाज उठवला असता तर आज आपण पाहतो ते चित्र पाहण्यास मिळाले नसते आज त्याच जमिनीचा भाव गगनाला भिडला आहे शालेय विद्यार्थ्यांनी नापास झाल्यास पुन्हा परीक्षा द्यावी शिक्षणामधील चिकाटी सोडू नका असेही सांगितले यावेळी मंगल शेलार यांचे मार्गदर्शन झाले तर सुरेश जाधव सरांनी शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात कसे जाता येईल याचे मार्गदर्शन केले सूत्रसंचालन नितेश डोंगरे यांनी केले तर प्रास्ताविक आगरी सेना युवक तालुका अध्यक्ष महेश भगत यांनी केले यावेळी आगरी सेनेचे कार्यकर्ते व सर्व क्षेत्रातील आगरी समाज कार्यकर्ते एडवोकेट महेश भगत तानाजी लिहे गुरुनाथ मात्रे दिनेश दळवी सुरेश गोंधळी उल्हास बाबरे महेश भगत विशाल भगत राकेश मुंडे नितीन राणे मार्तंड टेकडे शरद वारघडे यांनी कार्यक्रमाच्या सयोजनासाठी सहभाग घेतला होता.


No comments