न्याहाडी मोरोशी नदिवर रेतीमाफियांचा हैदोस;महसुल विभागाचे तलाठी सर्कल ठरलेत पुरस्काराचे मानकरी....
नामदेव शेलार / मुरबाड : हरिचंद्रगडवरून थिदबी गावापासून काळू नदिचा उगम होतो. ते थेट माळशेज घाटपायथ्याखाली असलेल्या न्याहाडी मोरोशी हे गाव या नदिपात्रा लगत असल्याने या गावाच्या हददितील काळूनदिचे संपुर्ण पात्रात ते नदिवरील पुलालगत न्याहाडीतील चार रेतीमाफियां सालाबाद प्रमाणे या नदिपात्रात जेसीबी यांत्रीक साधने वापरून खुलेआम रेतीची उपसा करीत आहेत.हि रेती सोन्याच्या भावात विकली जातेय शहरीभागातील ते घाटमाथ्यावरील जून्नर आळेफाटा ओतुर येथील बांधकामासाठी येथील रेतीचा वापर केला जातो. पहाटे ते रात्री असे रेतीचे ट्रकभर भरून जात असता महसुलीच कुंपणच शेत खात असल्याने शासनाचा लाखोचा महसूल बुडवून गौणखनीजाचा (वालूचा) उपसा होत असता या विभागातील तलाठी, सर्कल, हे ख-या अर्थाने पुरस्काराचे मानकरी ठरत असल्याची भावना नागरिक व्याक्त करतात.
माळशेज घाट हा वाळूचोरी मातीची चोरी,गोमास फुलांच्या गाडीतुन अवैधवाहतुक अशा तस्करीसाठी एक खुश्कीचा मार्ग बनला आहे,विशेष म्हणजे या मार्गावर जागोजागी महसुल विभागाची कार्यालये आहेत. पोलिस तपासनी पथक ते राष्ट्रीय महामार्गाच्या घाटात सावर्णे ते घाटात जागोजागी ह्या चौक्या आहेत.तर महसुल विभागाच्या चावड्या वैशाखरे टोकावडे उमरोली सरळगांव शिवळे मुरबाड ह्या ठिकाणी असून त्या देखील माळशेज हायवे वर असताना न्याहाडी मोरोशी काळूनदिवरील वाळू व मातीच्या ट्रक घाटमाथ्यावर वरून येणा-या अनेक रेतीच्या ट्रक वर कार्रवाई कां ?होत नाही हा सवाल नागरिक करीत आहेत. तालुक्यातील महसूल विभागच कोमात असल्याने बेकायदेशीर रेती चोरीला व माती चोरीला व ते कमी की काय ? या नदिपात्रातील पाण्याचा उपया माळशेज रस्त्यावर सिंमेन्टक्राँक्रीट कामावर पाणी मारण्यासाठी गेल्यवर्ष भर रोज शेकडो टॅकरद्वारे होत असल्याने त्यांनी तर नदिपात्र आटवण्यात व नदिच विद्रुपी करणास रानमोकळे मिळाले आहे.



No comments