web-banner-lshep2024

Breaking News

Asha Bhosale: संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत! आशाताई भोसले यांचे निधन


मुंबई : गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची सुरांची साथ संगत थांबली. आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एका युगाचा अस्त झाला आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला. विविध भाषेतून तब्बल 12 हजार गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे

काल, संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

No comments