मुरबाड मध्ये भरणार भव्य चंदन परिषद; इतिहास संशोधक योगेंद्र बांगर सर यांच्या उपक्रमाला उज्जाला..!
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड मधील शेलारी म्हाडस येथील शांताई निसर्ग पर्यटन केंद्र या ठिकाणी १२ एप्रिल २०२६रोजी भव्य चंदन परिषद भरणार असून अनेक मान्यवर सहभागी होत आहेत.या परिषदेचे हे सहावे वर्ष आहे.चंदन शेती ही अत्यंत किफायतशीर शेती असून ठाणे जिल्ह्यातील शेतकरी या शेतीकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहत आहेत.
मुरबाड तालुक्यात आता पर्यंत निसर्गप्रेमी योगेंद्र बांगर यांच्या माध्यमातून पाच चंदन परिषदांचे आयोजन करण्यात आले होते त्यातून हजारो चंदनवृक्ष जिवंत अवस्थेत असून शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किंरण दिसत आहे. चंदनाचे झाड लागवडीनंतर बारा वर्षांनी उत्पन्न देण्यास सुरुवात करते. चंदनापासून अत्तर, औषधे, सौंदर्य प्रसाधने,शोभेच्या वस्तू बनवल्या जातात . बाजारात चंदनाला खूप मागणी आहे.हा उपक्रम इतिहास संशोधक योगेंद्र बांगर सर यांनी मुरबाडला प्रथम राबवला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात चंदनाची लागवड करावी व आपले आर्थिक जीवनमान उंचवावे हा या चंदन परिषदेचा मुख्य हेतू आहे. चंदन लागवड कशी करावी,लागवड करताना कोणती काळजी घ्यावी, शासकीय नियम,चंदन लागवडीबाबत - समज गैरसमज या बाबत चंदन उत्पादक महासंघाचे संचालक श्रीकांत गोरे अहिल्या नगर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.
चंदन परिषदेसाठी मर्यादित शेतक-यांना प्रवेश दिला जाणार असून दुपारी ४ ते ६ या वेळेत परिषद आयोजित केली आहे.ज्या शेतक-यांना जून पासून चंदन रोपे लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी पूर्वतयारी या दृष्टीने या परिषदेचे महत्त्व आहे. इच्छूक चंदन प्रेमीनी संपर्क साधण्याचे आवाहन योर्गेंद्र बांगर यांनी केले असून 93 260 583 83 या क्रमांकावर संपर्क साधावा



No comments