न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमदार किसन काथोरे यांच्या हस्ते तर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण..!
नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाड न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते तसेच तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शासनाच्या केंद्र आणि राज्यस्तरावरील शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच व्यसनमुक्त आणि शाळा कॉलेज शिव्या मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले.
मुरबाडच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम उभा राहिला असून जनमाणसांना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले केंद्रामधील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा शासकीय योजना पासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी नागरिकांनी पुढे यावे असेही कथोरे यांनी सांगितले यावेळी शालेय शिक्षक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे निवृत्त शिक्षकांचा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक पाडवी सर ,पवार मॅडम ,कराळे सर, पाटील सर,गोडांबे सर,जाधव सर,भालेराव सर, बडगुजर सर यांच्यासह अन्य शिक्षक वर्ग उपस्थित होते.तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली तहसीलदार अभिजीत देशमुख अमोल शिंदे श्रीमती बांगर नायब तहसीलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या हस्ते स्वतंत्र सैनिकांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला व्यासपीठावर मुरबाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता संजय कोरडे गटशिक्षणाधिकारी थोरात हे उपस्थित होते यावेळी सामाजिक राजकीय स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments