मुरबाड मध्ये गुटखा विक्री सर्रास पोलिसांची धडक कारवाई...!
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड मध्ये पान टपरीवर पोलिसांनी गुरूवारी धाड टाकली आहे.सदरील धाडी दरम्यान टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळत आहे.मुरबाड शहरात सर्रास गुटखा विक्री सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत आहेत.त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बातम्या सुद्या प्रकाशित झाल्या आहेत.
सदरील पानटपरी धारक याला ताब्यात घेतले असून चौकशी दरम्यान अजून किती गुटखा किंग यांची रांग लागते हे मात्र गुलदस्त्यात आहे.मात्र मुरबाड तालुक्यातील शहरातील मुख्य गुटखा किंग डिलर अद्याप मोकाट असल्याची चर्चा असून त्यांच्यावर कारवाई का? होत नाही अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो.उपनिरिक्षक दिपक हिंदुराव, गोपनीय विभागाचे पोलिस अंमलदार रामदास काळे, पोलिस अंमलदार दिपक गिते यांनी सदरील कारवाई केली आहे.



No comments