web-banner-lshep2024

Breaking News

इंग्रज काळखंडामधील नवसाला पावणारा मुरबाडचा राजा याचे 96 वे वर्ष पूर्ण यावर्षी एक दिवस पाहूनचार वाढला..!

नामदेव शेलार / मुरबाड : इंग्रजाच्या कालावधीत 1930 साली स्थापना झालेला नवसाला पावणारा मुरबाडचा राजा या गणरायाला 96 वर्षे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र मधील पुण्यातील कसबा पेठच्या गणेशमूर्तीची स्थापना झाल्यावर मुरबाड कसबे गावात मुरबाडला गणेशाची स्थापना झाली आहे त्यानंतर मुबंई च्या लालबागचा राज्या ची स्थापना करण्यात आली आहे मुरबाडचा राजा नवसाला पावणारा आहे त्याची पूजा मुरबाडचे तहसीलदार यांच्या हस्ते होते एकादशीला मुरबाडच्या राजाचा वाजत गाजत विसर्जन होते मात्र यावर्षी गणरायाचा पाहुणचार एक दिवसांनी वाढला आहे. 

मुरबाड ताड आळी मधील जाधव कुटुंबाच्या घरात मुरबाडच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे नवस फेडण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची गर्दी असते ताड आली मोठा गणपती मंडळाचे संयोजक बाप्पाची देखभाल करून हरिपाठ भजन जागर करतात गणेशाचे विसर्जन करण्यापूर्वी सत्यनारायणाची महापूजा तहसीलदार यांच्या हस्ते होते यंदा मुरबाडच्या राजाला 96 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. 

इंग्रज कालखंडात मुरबाडला पाणीपुरवठा करणारा जुना तलाव आहे त्याच तलावामध्ये मुरबाडच्या राजाची गावभर मिरवणूक काढून विसर्जन केले जाते मोरया गोस्वामी यांच्या पावनस्पर्शी झालेल्या मुरबाड कसबे गावाचे रूपांतर मुरबाड शहरात झाले असताना मुरबाडच्या राज्याची जागा अद्यापही बदललेली नाही मुरबाड सह बदलापूर ,कर्जत ,रायगड, पुणे ,अहमदनगर, ठाणे, नाशिक,पालघर ,मुंबई ,रत्नागिरी जिल्ह्यातून भक्तगण दर्शनासाठी येतात हजारो भक्तांना नवसाला पावणारा मुरबाडच्या ताडआळीचा राजाची भव्य दिव्य देखणी मूर्ती असून मकर सजावट राजमहलासारखी करण्यात आली आहे भाविकांसाठी सभा मंडपामध्ये सुसज्ज सोय करण्यात आली असून मुरबाड तालुक्याचा राजा दोन शतकामधील एकमेव गणपती बाप्पा स्वतंत्र्य काळापूर्वीचे आहेत.

मुरबाडचा राजा गणेशोत्सव ताडआळी मंडळाचे राकेश जाधव,हेमंत जाधव, कुणाल जाधव, हर्ष जाधव, सोहम जाधव ,नरेश जाधव, भावेश जाधव, श्रवण जाधव, अमित जाधव, करण जाधव ,अक्षय जाधव, सागर जाधव, प्रफुल जाधव, कुणाल मुसळे, चेतन मुसळे, कुणाल गंदे, नयन महाडिक, सचिन महाडिक, योगेश महाडिक, राहुल म्हात्रे,सुजित ठाकरे ,स्वप्निल भोईर ,वैभव लाटे ,संदीप भोईर, मंगेश चव्हाण ,मनोज वारघडे ,रोहित शेळके, स्वप्निल जाधव, भूषण जाधव, श्री किरण जाधव, यश अमित जाधव, सुभाष शेवाळे, ज्ञानेश्वर शेवाळे, जयेश गंधे, तेजस गंधे,नरेश शेळके, दिनेश शेळके, दीपराज शेळके, सचिन मुसळे, कल्पेश बैरागी, सुशील बैरागी ,जितेश जाधव, पराग तोंडलीकर ,मिहीर ठाकरे यांनी सुसज्ज नियोजन केले आहे.

No comments