भारत वॉईन शॉपला सार्वजनिक रस्त्यावरुण बाहेर काढण्याचा नगरसेविकचा ठराव बसनात गुंडाळला..!
गौरव शेलार/ मुरबाड: मुरबाड शहरातंर्गत शाळेसमोर,मंदिराच्या ठिकाणी,रहदारी वस्तीत मुरबाड नगरपंचायत इमारतीच्या खाली भारत वॉईन शॉप हा खुलेआम बनवाटी दारू विक्री करित असल्याच्या चर्चेला उधान आले होते.त्यावेळी मुरबाडच्या नगरसेवकांनी वाईन शॉप शहराबाहेर हलवण्याचा घेतलेला ठराव अद्याप गुलदस्त्यात आहे.त्यानंतर अनेकांनी पत्रव्यवहार केले.काही महिण्यापूर्वी भारत वॉईन शॉपला शहराबाहेर हलविण्यासाठी एकमताने ठरावही झाला होता परंतु राजकीय वरदहस्ताने आणि अधिकारी यांना मन्नुभाईकडून मिळणार्या हप्तेबाजीच्या आशिर्वादाने कारवाई मात्र धुळखात पडून राहिली.
गेल्या महिन्यात भारत वॉईन शॉपवर राज्य उत्पादनाची चौकशी धाड पडली मात्र 2 तासाच्या चौकशीनंतर आकडेवारीत मॅनेज झाल्याचे गुढ कायम राहिले आहे अधिकारी यांना पत्रकारांनी विचाराणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊन पळ काढला.एका तक्रारदाराने या भारत वॉईन शॉपचा जुना व नवा रेकॉर्ड अधिकारी यांच्या समोर ठेवूनही गेल्या काही महिण्यांपासून कारवाईचा शिमगा फुंकला गेला नसल्याने एमपीडीए अंतर्गत अद्दयाप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून मुरबाड नगरपंचायत अधिकारी यावर जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.वाईन शॉप मालकांनी राजकीय सत्ता धारी भागीदार घेतल्याचे मनुभाई त्याच्या नावाने तक्रारी करणाऱ्याना धमकावत असतो.राजकीय वरदहस्तानी अनेकांना हप्तेबाजीत बांधून ठेवल्याने मोफतची दारूचा महिना हप्ता अनेकांना मिळत असल्याचे जाणकरांमध्ये बोलले जात आहे.याच भारत वॉईन शॉपची संत्रा नावाची देशी दारू अनेक टपर्यांमध्ये मिळत असल्याने बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री मालक मन्नुभाई यांच्याच संमतीने आणि अधिकारी यांच्या संगणमताने होत असल्याची शक्यता वर्तवली जात असूनस्थानिक लोकप्रतिनिधीच्या नशामुक्तीअभियानाला आव्हान वॉईन शॉपमालकांनी दिला आहे.
बेकायदेशीर चालणाऱ्या भारत वाईन शॉपला कोणत्या निकष व कागदोपत्री पुराव्याच्या आधारावरपरवानगी दिली आहे ? भारत वॉईन शॉप शहराबाहेर हलविण्यासाठी झालेला ठराव कुठे गायब झाला काय कार्यवाही करण्यात आली याचे उत्तर अधिकारी देत नसून नगरपंचयतने कारवाई साठी पत्र काढल्याचे मुख्याधीकारी यांनी सांगितले आहे.मुरबाड नगरपंचायत इमारतीच्या खाली भारत वॉईन शॉप असल्याने दर दिवसाआड दारूचा साठा येत असल्याने याच नगरपंचायतीच्या इमारतीखाली दारूचा साठा भारत वॉईन शॉप साठवणूक करून ठेवतोत्यासाठी वेगळा गोडाऊन नाही भविष्यात आग लागल्याने नगरपंचायतीमधील नागरिकांचे तसेच गोपनिय असलेले महत्वाचे कागदोपत्र, परिसरातील दुकाने जळण्याची शक्यता नाकारली जात नसून हे मुरबाड नगरपंचायतीला माहिती असून अद्दयापही कोणतीच कारवाई मुरबाड नगरपंचायतकडून करण्यात आलेली नाही. कर वसुली करण्यासाठी नगरपंचायत प्रथम स्थानी येत असल्याने याच भारत वॉईन शॉप.शाळा जवळ असल्याने याच रहदारी वस्तीतुन लहान मुलं मुली प्रवास करतात 200 मीटरच्या आत असलेला या वॉईन शॉपवर सकाळी 9 वाजल्यापासून मद्दाधुंदी करणारे मद्दयप्रेमी यांची हजेरी लागते.त्यामुळे अनुकुचित प्रकार घडल्यास कोणता प्रशासन यावर कारवाई करेल असा प्रश्नच आता जनतेला पडला आहे.गेल्या काही वर्षात याच भारत वॉईन शॉप जवळ हाणामारीचे प्रकार घडले आहेत त्यानंतरही प्रशासन जागे झाले नाहीत फुकटची दारू मिळाल्याने कारवाई होण्याचा संभव कसे व्यक्त केला जाऊ शकतो असे जाणकरांचे मत अनेकांच्या कार्यक्रम उत्सवाला भारत वॉईन शॉपची देणगी भलीमोठी असल्याने भारत वॉईन शॉपला अनेकांचे प्रेम प्राप्त झाले आहे.कोणी फिरायला जायाचे झाल्यास भारत वॉईन शॉपमालक मनुभाई त्यांना हजारो रूपयाचा आशिर्वाद देत असल्याचे मुनुभाई स्वता सांगतात तसेच अनेक जन फुकट दारू घेऊन जातात त्या मुळे धंदा चालवणे जिकरिचे झालं आहे त्या मुळे त्यानी एका भाजपा नेत्याला भागीदारी घेतल्याचे सांगत असून हा नेता कोण तो मुरबाडला चालणारी दादगिरी, अवेद्य धंदे, बेकायदेशीर, कामाना बळ देतो यांचे सरकार आणि वरिष्ठ अधिकारनी पुरावे तक्रार दराकडे मागण्या पेक्षा सरकार ने त्यांची एटीएस मार्फत चॉकशी करावी अशी मागणी मुरबाकरानी केली आहे शहरात अमली पदार्थ,गुटखा बंदी करण्यासाठी रॅली काढली तशीच एक रॅली हा भारत वॉईन शॉप बंद काढण्यासाठी काढल्यास अनेक मद्दयप्रेमी व्यसनापासून मुक्त होतील हेच सत्य आहे. तक्रारदाराच्या केलेल्या पत्रव्यवहाराला अधिकारी वर्ग दाद देत नसल्याने भिजतघोंगडे ठेवलेल्या या प्रकरणात थेट राज्याचे पारदर्शक,सक्षम,कुशल,मुख्यमंत्री यांनी लक्ष वेधून भारत वॉईन शॉपला मुरबाड नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागाच्या बाहेर हलवून व्यवसाय करण्याचे आदेश द्दयावेत अन्यथा नागरिक लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा पवित्रा घेणार असून कारवाई करण्याची मागणी करणार आहे.



No comments