web-banner-lshep2024

Breaking News

मराठा आंदोलनाचा गणेश दर्शनावर परिणाम मुंबईच्या गणपती दर्शन भक्तांनी केलं रद्द;गरिबांच्या मुलांना कुठे मिळालं आरक्षणाचा फायदा?

 

नामदेव शेलार / ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईचा लालबागचा राजा चिंचपोकळी गोरेगाव मुंबई सह भव्य दिव्य देखावे पाहण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना भीतीचे सावट निर्माण झाले आहे दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यावर हजारो युवक युवती भक्तगण जिल्ह्याच्या ग्रामीण शहरी भागातून मुंबई गणपती दर्शन जातात बहुतेक भक्तगण रेल्वेने प्रवास करतात मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई रेल्वे स्टेशनवर महापालिकेसमोर आंदोलन सुरू केल्याने आंदोलन थांबले नाही तर काय घडेल या भीतीने लोकांनी मुंबईकडे जाण्याचे टाळले आहे. 

मुंबईमध्ये आंदोलकांच्या वाहनाने ट्रॅफिक जाम झाली असल्याने मुरबाड पासून जिल्ह्यातून मुंबईकडे वाहने घेऊन जाणारे भक्तगण व्यावसायिकांनी घरीच बसणे स्वीकारले आहे महाराष्ट्रात ओबीसी मराठा आरक्षणाचा संघर्ष निर्माण झाला सरकारने मुलींना मोफत शिक्षण जाहीर केले तसेच ओबीसी सह अन्य समाजाच्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषणावेळी केली परंतु अद्यापही कोणत्याही समाजाच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण योजनेचा लाभ मिळाला नाही उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना नेत्यांच्या कॉलेजमध्ये मोफत शिक्षणाचा लाभ झालेला नाही तसेच मराठा असो किंवा ओबीसी यांच्या गरीब मुलांना समाजात मदतीचा हात मिळत नाही सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने आरक्षणाबद्दल गरीब नागरिक स्तब्ध शांत आहेत मात्र राजकारणी आपलं राजकारण करत आहेत सरकार आणि सरकार मधील मंत्री यांच्या माध्यमातून आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर सामान्य चाकरमानी यांना दळणवळणाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

No comments