Earthquake : भूंकपाने मेळघाट हादरले, सहा महिन्यानंतर दुसर्यांदा झटका
अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेळघाटाला भूकंपाचे पुन्हा हादरे बसले आहे. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. आठ महिन्यांपूर्वीच या भागाला भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा जमीन हालली. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. या भागात सातत्याने जमीन हादरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस या भागाला भूकंपाने हादरा दिला होता.
अमरावतीमधील मेळघाटमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा झटका जाणवला. 9 वाजून 57 मिनिटांवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी जमीन हादरल्याने नागरिक घराबाहेर आले होते. नागरिकांना भूकंपाची जाणीव झाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. या भूकंपाचे केंद्र हे मेळघाट परिसर होते की इतर याची माहिती अजून समोर आलेली नाही.



No comments