मुरबाड मध्ये स्कुटीवरील गुटखा विक्रीला आळा घालण्यास यंत्रणा ठरली कुचकामी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया..!
ठाणे : ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यासह शहरात राजरोसपणे गांजा गुटखा गावठी दारू विक्री होत असून त्याकडे मात्र पोलिसांचे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.प्रतिबंधित गुटखा हा मुरबाड तालुक्यासह शहरात चक्क स्कुटीवर विक्री होत आहे.पोलिसांच्या नजरेसमोरून या गोरखधंदयाची वाटचाल सुरू असून त्याकडे मात्र दुर्लक्ष का केला जातो हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मुरबाड एमआयडीसीसह परिसरात मोठया प्रमाणात हा गुटखा गांजा विक्री होत असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून कळत आहे.विशेष म्हणजे हा गुटखा चक्क घरातून व स्कुटीवर महिला पुरूष विक्री करत आहेत.महाराष्ट्र सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रम काळात पुरस्कृत विभागांचे सत्कार केले मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता विभागांना अव्वल नंबर देवून भ्रष्ट्राचाराला कुठे तरी दुजोरा सरकारनेच दिला असल्याचे चित्र दिसत आहे.विरोधी पक्ष मात्र मुग गिळून गप्प का असा सवाल मात्र जनमाणसातून उपस्थित होत आहे. (मालिका भाग - 1)



No comments