web-banner-lshep2024

Breaking News

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी..!

 

कोकण रेल्वे हा निसर्गावर मात करीत घडविलेला एक मोठा चमत्कार म्हटला जातो. उभा सह्याद्रीचा कातळ कापून या कोकण रेल्वेचे बोगदे तयार करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मान्सून काळात धावण्यासाठी सुसज्ज झाली आहे. 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात मान्सून वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे धावत असते.

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळुन अपघात घडले आहेत. कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. मान्सूनकाळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.

कोकणात मान्सूनकाळात काही बिकट प्रसंग आल्यास  ARMVs व्हॅन रत्नागिरी आणि वेरणे येथे सुसज्ज ठेवल्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कचा प्रोब्लेम मदतीसाठी अडसर ठरु नये म्हणून या ARMVs व्हॅन कर्मचाऱ्यांना त्वरीत संपर्कासाठी सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात राबविण्यात येत आहे. या काळात नेहमीच्या वेळापत्रका ऐवजी मान्सून वेळापत्रकाने ट्रेन धावत असतात. सातत्याने जिओ सेफ्टी कामांच्या गुणवत्तेमुळे कोकण रेल्वेचा प्रवास निर्धोकपणे सुरु असतो. पावसाच्या या 4 महिन्याच्या कोकणातील पावसात कोकण रेल्वे सुरळीत धावण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी 24 बाय 7 पेट्रोलिंग आणि ट्रॅक मॉनिटरिंगसाठी नेमलेले आहेत.

 

No comments