web-banner-lshep2024

Breaking News

न्याय नाही गावाला चोर भारी देवाला शंभोमहादेवाचा मंदिर तोडणारे चोर आध्यप फरार...!

नामदेव शेलार  /  मुरबाड : मंदिर तोडणा-या समाज कंटकावर गुन्हा दाखल होऊन तीन   महिणे  उलटले कर्तव्यदक्ष पोलिसांना  तो अद्यापही  सापडत नाही.शिवभक्त, भाविक, मुरबाड करांच्या भावनेच्या  श्रद्धेला मोल नाही ? गेल्या महिणा भर पावसाचा मारा शिवपिंडीवर होतोय,  जर हे देवाला देखील गंडविण्यास मागेपुढे पहात नाहीत तर माणसाचं काय ?  असा सवाल भक्तांनी केला आहे,           

    संगमदेवस्थाची कमिटी बरखास्त तहसिलदार मुरबाड हे प्रशासक आहेत व प्रशासक म्हणून तहसिलदार  असल्याने तहस़शिलदार अभिजित देशमुख यांनी महाशिवरात्रीला रात्रीला या चार दिवसा अगोदर तोडलेल्या भग्ननंदिरात अभिषेक केल्याची कबुली दिली आहे, तर या मंदिराचे प्रशासक म्हणून महसूल विभागाकडे  जबाबदारी असताना मंदिर कोणी तोडले हा प्रश्न गौण आहे, महसूल विभागाकडे   संगम येथील देवस्थानचे प्रशासक जबाबदारी पारपाडीत असलेल्या  मंडळ अधिकारी नी आपल्या अहवालात नमूद केले  आहे की प्रशासक म्हणून काम करीत असता  येथील देवस्थाचा कळस व मंदिर तोड करीत असलेल्या  कामगारांना सोबत उपस्थित असलेला ठेकेदार यांनी सदरचे कामाची मंजूरी साबा विभागाकडून असल्याची प्रत दाखवून मंदिर तोडल्याचे पत्रात नमूद असताना  हि पोलिस व महसूल विभाग त्या   समाजकंटक   ठेकेदाराला पाठिशी घालून  तोडल्यांचे माहित नसल्याचे  वेडपांघरून घेत त्याची पाठराखण करीत आहेत.

   शरद भुंडेरे पाटिल यांनी ११ते १४ मार्च  चार  दिवस उपोषण केल्याने महसुल विभागाने गुन्हा दाखल करून आज दिडमहिणा  उलटला  कर्तव्यदक्ष  मुरबाड पोलिस  ठाण्यातील त्या गुन्ह्याच्या कागदावर  धूळ साचली आहे.उपोषणाची गंभिर दखल घेण्या ऐवजी त्या समाजकंटकाला वाचविण़्-याचा  आटापिटा पोलिस करीत असल्यांची भावना नागरिक व्याक्त करीत आहेत,  संबधीत मंदिर ट्रस्ट कडून देखील त्या मंदिर तोडणा-यावर गुन्हा दाखल करण्यास मुरबाड पोलिसा कडून  टाळाटाळ झाल्याने शंकेला जागा उरली नाही, येत्या चार दिवसात जर पोलिसाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर लवकरच पुन्हा साखळी  उपोषणाचा ईशार  शरद भुंडेरे  पाटिल समाजसेवक दिपचंद यशवंतराव  कमिटीने  दिला आहे.देवाला न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष  शरद भुंडेरे पाटलांच्या उपोषणाची  घेण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ करीत असले तरी   मंदिर कोणी तोडले हे उपोषण कर्त्यासह जगजाहीर असले   तरी  खुलेआम नाव घेतल जात नाही व राजकीय आस्रय लाभलेल्या ठेकेदारे विरोधात नरमाई होत असली तरी   ठेकेदाराला वाचविण्याचा आटापिटा केला जात असला तरी. लवकरच अनेक  संघटनां  मुरबाड बंद ची तयारी करीत  असल्याचे खात्री लायकवृत्त आहे,  अद्न्यात व्यक्तीवर गुन्हा दाखल  तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिले असल्याचे प्रसिद्धी माध्यंमा समोर सांगितले आहे.मुरबाड आणि शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवभक्तांच भक्तीस्थान असलेल काळू डोईफोडी नद्यांच्या  संगमावरील श्री क्षेञ संगम येथी शंभो  महादेवाच दोनशे वर्षाहून अधिक काळातील  पौराणीक मंदिराच जिर्णोध्दार करण्याच सोडून , त्या जागी नविन मंदीर बांधण्याच्या नादात हे मंदीर महाशिवराञीच्या काळात कोण तो ठेकेदार नाही नाव आणि पत्ता त्याने भुई सपाट  केल्याने प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद भुंडेरे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाच अस्ञ उपसताच शेकडो शिव भाविकांनी पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देत मंदीराच्या कळसावर हातोडा मारणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली . तर जो पर्यंत मंदीराच पाविञ्य नष्ठ करणा-यावर गुन्हा दाखल होत नाही तो उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार शरद पाटील यांनी केला आहे .

               तालुक्यातील सरळगांव किन्हवली रस्त्यावर काळु डोईफोडी नद्यांच्या संगमावर संगम ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुरातन शिव मंदीर असुन या मंदीराचे देखभालीसाठी असलेली ट्रष्ट शासनाने रद्द करुन मंडळ अधिकारी श्रीमती उज्वला दराने यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे .

No comments