खापरी जि.प. शाळेवर चोरांची हातसफाई...!
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलिस ठाण्यापासून अवघ्या दिड किमी अंतरावरील खापरी गावातील जिल्हा परिषद शाळा मागिल वर्ष भरात दोनदा ह्या शाळेतील धान्यचोरीला गेल्याच्या घटना घडल्या असता पोलिस ठाण्यावर तक्रार देऊन देखील काही निष्पन्न होत नसल्याने चोरांच मनोधैर्य वाढले की काय,असा सवाल केला जात आहे, आत्ता तर आज्ञात चोरट्यांनी हातसफाई करून शाळेचे टाळे फोडून शाळेतून मुलांचा शिल्लक पोषण आहार धान्या सोबत डिजिटल साहित्य चोरून नेले आहे.
खापरी गावातील या शाळेत ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत खापरी, कामतपाडा, वैतागवाडी या गावातील मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत ५ शिक्षक कार्यरत आहेत. सध्या शाळांना सुट्टी असल्याने व शाळा गावच्या बाहेर असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन शाळेतील कार्यालय, वर्ग, स्वयंपाक घर यांच्या खिडक्यांचे ग्रील कटरने कापून ४५ इंचाच्या २ टीव्ही, १ लॅपटॉप, १ प्रिंटर, १ पेन ड्राइव्ह, ही डिजिटल साहित्यावर डल्ला मारला आहे.त्याचबरोबर तांदूळ २७४ किलोग्राम, मुगडाळ ८६ किग्रा, मसुरडाळ ३९ किग्रा, मटकी २४ किग्रा, वाटाणा ४८ किग्रा, तेल १७किग्रा असा शिल्लक पोषण आहार धान्य साठाही चोरून नेला असल्याची तक्रार शिक्षक विलास जाधव यांच्याकडून टोकावडा पोलिसात केली आहे



No comments