कसारा ते सीएसएमटी ट्रेन मधून पडून एकाचा मृत्यू 9 जण जखमी..!
गौरव शेलार/ ठाणे : आज दिनांक ०९/०६/२०२५ रोजी सकाळी ०९:२० वाजताच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी(०८:१९) या फास्ट ट्रेन मधून अंदाजे १० प्रवासी मुंब्राच्या रेल्वे स्टेशनच्या फास्ट ट्रॅक जवळ मध्ये लोकल ट्रेन मधून खाली पडले आहेत.सदर घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे लोकप्रतिनिधी संजय वाघुले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर उपस्थित असून कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित आहेत व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमकडून युद्धपातळीवर सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
No comments