मुदत संपलेल्या काल्यापिल्या जीप आरटीओ अधिकाऱ्यांनी बंद केल्या होत्या त्यांना पुन्हा हिरवा कंदील;आरटीओच्या कारवाईत महिन्यात बुडाला हप्ता..!
गौरव शेलार / मुरबाड : अवैद्य धंद्यांनी गुन्हेगारी वाढते ''आका'' तयार होतो
त्यांना प्रोत्साहन देणारे एकमेकांवर आरोप करतात अशाच प्रकारे कर्जबाजारी
होऊन काल्या पिवळ्या जीप चालवण्याचा कल्याण मुरबाड रोडवर व्यवसाय
करणाऱ्यांवर कल्याण परिवहन अधिकाऱ्यांनी अन्याय केला होता त्याला चाप बसला
आहे.मासिक हप्ता मुरबाड ,शहाड, कल्याण येथील संबंधित
यंत्रणेला देऊन प्रवासी वाहतुकीला कित्येक वर्ष प्रोत्साहन देणाऱ्या परिवहन
आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक काळयापिवळ्या जिप प्रवासी वाहतूक करतात त्यांची
मुदत संपली म्हणून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप बंद केल्या होत्या त्यामुळे
काल्या पिवळ्या वाहने चालवणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली होती.
मात्र
अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून मासिक मिळणारा हप्ता 2-3
महिने बंद झाला होता. तसेच मुरबाड कल्याण वरून एसटी बसेस उपलब्ध नसल्याने
प्रवासांचे हाल होत होते.एका बाजूला अवैध्य प्रवासी वाहतूक राज्यात
सर्वत्र सुरू आहे.दुसऱ्या बाजूला पोलीस आणि आरटीओ यांच्याकडून कारवाई केली
जात नाही अशी ओरड सुरू असताना मुरबाड कल्याण रस्त्यावर प्रवासी घेऊन
जाणाऱ्या काल्या पिवळ्या वाहनांवर पंधरा वर्षे मुदत संपली असताना वाहने
चालवली जातात म्हणून परिवहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहने बंद केली होती.त्यांना पुन्हा 'आका'नी तीन महिने मुदत वाढवून दिल्याने प्रवाशांमध्ये
तर्कवितर्क काढले जात आहेत.
प्रत्येक अवैध्य
व्यवसायामध्ये गुंडगिरी दहशतीचा शिरकाव सरकारी अधिकारी आणि राजकीय वारसा
मुळेच "आका" जन्माला आला असल्याचे राज्यात समोर आले आहे त्यामध्ये मुरबाड
मागे नाही आरटीओ अधिकाऱ्यांनी पोलिसांनी लहान वाहाने मालवाहतूक वाहाने
त्यांनाही सन्मान न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.



No comments