web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये बनावट पनीरची चौकशी गुलदस्त्यात;अन्न भेसळ कायदा अधिकारी गप्प..!

नामदेव शेलार/ मुरबाड : गेल्या वर्षी पुण्यामध्ये बनावट पनीर बनवणाऱ्या टोळीचा शोध तेथील संबंधित यंत्रणेने लावला होता त्याचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात पुन्हा गाजला असल्याने मुरबाडच्या बनावट पनीर विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बनावट पनीर बनवून त्याची विक्री मुरबाड मधील काही विक्रेते ग्राहकांना करत होते त्यावर धाडी टाकून संबंधित अधिकाऱ्यांनी आपसात समझोता करून सोडून दिल्याची चर्चा होती तेव्हापासून अन्न भेसळ कायद्याचे अधिकारी मुरबाडला फिरकले नाहीत कोणावरही कारवाई झाली नाही मासिक भांडवलीने अनेक अवैध धंद्यावाल्यांना अधिकारी प्रोत्साहन देऊन गप्प बसत आहेत. 
 
मुरबाड मध्ये दररोज शेकडो किलो पनीर विक्री होतो मुरबाड तालुक्यात काही कंपन्या पनीर बनवत असल्याची माहिती अन्नभेसळ कायद्याच्या अधिकाऱ्यांना असताना त्यांची चौकशी मधून काहीही सत्य बाहेर आलेले नाही परंतु राज्याच्या विधानसभा अधिवेशनात बनावट पनीरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने मुरबाड मध्ये बनावट पनीर विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुरबाड शहर आणि परिसरात दूध विक्री करणारे ग्राहकांना नासका दूध विक्री करतात बनावट पनीर विक्री केली जाते एका कंपनीत पनीर बनवला जातो तेथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही तालुक्यात लग्नसराईत सण उत्सवात पनीर भाजीला जास्त मागणी असते पनीरची टेस्ट करणारे अन्न औषधे कायद्याचे अधिकारी महिन्यातून एक फेरी मारून जातात.
  
      मात्र कोणत्याही पनीर विक्रेता तसेच दुधात पाणी टाकून आणि पिशवीचे दूध फोडून त्यामध्ये पावडर टाकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत शासनाने गुप्तचर यंत्रणेमार्फत मुरबाड मधील पनीर विक्रेते दूध विक्रेते यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

No comments