web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड नगरपंचायतमध्ये भाजपा नगरसेवकांचा भाजपाला कडवे अहवान तरुण नगरसेवकांनी बनवला वेगळा गट;देशात-महाराष्ट्रात घडलेली पहिली घटना...!

नामदेव शेलार / मुरबाड : महाराष्ट्रात मुरबाड तालुका राजकारणात एक नंबर असल्याच्या शब्दात नाखव्या तरुणांनी उजाला दिल्याने राजकीय सामाजिक स्तरावर खळबळ उडाली आहे सध्या भारत देशात महाराष्ट्रात भाजपाचे राज्य आहे सत्ता काबीज करण्यासाठी ईडी(ED),सीबीआय(CBI) अन्य प्रकारचा त्रास देऊन विरोधी पक्षातील मातंबर नेत्यांना भाजपात येण्यास भाग पाडल्याच्या राजकीय विरोधी पक्षाच्या आरोपांना मुरबाडच्या युवक नगरसेवकांनी चपराक देऊन मुरबाडच्या राजकीय वादळात भिडकावली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वत्र भाजपाची सत्ता असताना भाजपाच्या हम करो से कायद्याला भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची स्थापना करून चपराक दिली आहे फक्त त्यांनी भाजपा पक्ष वेगळा केला नाही एवढंच बाकी राहिला आहे मात्र भाजपा पक्षाविरोधात जाणाऱ्या युवक नगरसेवकांचे नेतृत्व करणारा कोणीही मोठा नेता नसताना त्यांनी केलेले धाडस भाजपाच्या भोपळ्याची हवा काढणारा ठरल्याच्या प्रतिक्रिया मुरबाडमध्ये उमटत आहेत.

     मुरबाड नगरपंचायत मध्ये सत्ता संपादन करताना भाजप नेत्यांनी शहरातील सामाजिक काम करणाऱ्या उमेदवारांनापराभूत करून नगरपंचायत मध्येआपल्या मतांचे लोकं निवडून आणले ज्यांना ठेकेदारी विविध स्तरावर मदतीचा हात दिला त्यांनीच बड्या नेत्यांना अहवान देण्याचा हा मुरबाड मध्ये भाजपामध्ये घडलेला पहिलाच प्रकार आहे. मुरबाड शहरातील चांगले वातावरण राजकीय घडामोडीतून दूषित केले गेले आहे मात्र शहराच्या समस्या जठिल बनले आहेत ठेकेदारीतून नगरसेवक आणि नगरसेवकांची ठेकेदारी अशा मक्तेदारीत मुरबाड नगरपंचायत मध्ये रस्ते सौचालय गटारी इमारती नवीन जुन्या इमारती उभारणी जुन्या पडीक इमारती उभारणे वाहन खरेदी विद्युत पोल स्वच्छता अभियान वृक्ष लागवड शिक्षण कर तलाव सुशोभीकरण बागेश्वरी पार्क, पाणीपुरवठा,विद्युत पोल, पिव्हर ब्लॉक,अशा कामात आजपर्यंत 100 कोटीच्या कामात काही कोटीचा गैरप्रकार झाला त्यांची पाठ राखण भाजपा सत्ताधारी नेत्यांनी करून सामान्य नागरिकांच्या तक्रारी, माहिती अधिकार अर्जांना केराची टोपली दाखवून बळ दिले त्याच भाजीपाला नगरपंचायत मधून घालवण्याचा काम नवीन युवक नगरसेवकांनी केला आहे त्यांचे सर्वत्र स्वागत होत असून शहरातील जुन्या जाणत्या सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठांनी एकत्र येऊन शहराबाहेरील लोकांना मुरबाड नगरपंचायत मध्ये नगरसेवक बनवण्याचा भाजप नेत्यांनी खटाटोप करू नये असाच सल्ला वेगळा गट निर्माण केलेल्या 9 नगरसेवकांनी भाजपाला दिला असल्याचे बोलले जात आहे.

      पक्षाचा नेत्यांचा ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांना वेळ मिळत नाही मात्र ज्यांना खांद्यावर घेतले त्यांनी डोक्यावर पाय दिल्याचे चित्र राजकारणात दिसू लागले आहे ज्या नगरसेवकांनी भाजपा सत्ताधाऱ्यांना आपल्याच आखाड्यात गटबाजीचे आव्हान दिले हे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या तक्त्याला लाजवणारी घटना राजकारणात वाटत असली तरी स्थानिक शहरवासी यांनी त्यांचे स्वागत करून परकीय चलनातील बंदे रुपये बाद करण्याचा शुभारंभ असल्याचे बोलले जात आहे.

मुरबाड नगरपंचायत मध्ये एकूण सत्तरा प्रभाग असून भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आजपर्यंत राहिले आहेत त्यातील प्रत्येकाला आजपर्यंत एक वर्षाचा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद दिले समित्या दिल्या कोटी ची कामे दिली असताना हुकूमशाही भाजपाच्या राजकारणाला गटबाजीचे ग्रहण कोणी लावले असा सवाल शहरातील नागरिक करत आहेत. नवीन गटस्थापन करणाऱ्या दहा नगरसेवकांच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्याचे वृत्त असून वेगळा गट स्थापन करून नगरसेवकांनी कोणत्या नेत्यांना आव्हान दिले आहे त्यांचे नेतृत्व कोणता नेतृत्व करत आहे. हे गुलदस्त्यात आहे मुरबाड नगरपंचायत बरखास्त करून पुन्हा ग्रामपंचायत करण्यात यावी येथील शहरवासीयांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

   मुरबाड नगरपंचायत शहरातील घरपट्टी धारकांकडून शिक्षण कर वसूल करतात परंतु मुरबाड शहरात मुरबाड नगरपंचायतीची एकही बालवाडी अंगणवाडी,शाळा,नाही तसेच वृक्ष लागवड होत नसताना कर घेतला जातो शहरात आरोग्य व्यवस्था नसताना आरोग्य कर घेतला जातो महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय नाही एका ठिकाणी ऑनलाइन शौचालय आहे त्यामध्ये पाणी नाही शहरातील प्रमुख रस्त्यावरून दोन वाहने एका वेळी जात नाहीत अशी मुरबाड नगरपंचायत बरखास्त करून ग्रामपंचायत शासनाने करावी ठेकेदारी राजकारणाला आळा घालावा सामाजिक,पत्रकारिता,क्षेत्रातील व्यक्तींमुळे शहराचा विकास झाला आहे त्यांना लोकप्रतिनिधित्वाचा मान मिळाला पाहिजे अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत

No comments