मुरबाडमध्ये चोरांच्या भुया उंचावल्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष..!
गौरव शेलार /
मुरबाड : मुरबाड शहरात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असल्याने गर्दीचा फायदा घेत
एसटी मध्ये चढत असलेल्या एका वृद्ध इसमाचे ५० हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला
प्रवाशांनी पकडून मुरबाड पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची घटना घडली आहे.बँकेतून
एका वृद्ध इसमाने ५० हजार रुपये काढून आपल्या गावी जाण्यासाठी मुरबाड एसटी स्टँड मधील
एसटी मध्ये चढत असताना एका पाकीटमाराने ते पैसे चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र
एसटी स्टँड मध्ये बिसलेरी पाणी बॉटल विक्री करणाऱ्या तरुणाच्या ही चोरीची बाब
लक्षात येताच आरडाओरडा केल्याने प्रवाशांनी त्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन
केले.
मुरबाड बाजारपेठेतील असणार्या बँका गेली वर्षभरापासून एमआयडीसी तसेच हायवेलगत गेल्याने नागरिकांच्या होणार्या पायपीट व चोरांच्या नजरा टिपून बसलेल्या असून नागरिकांच्या जीवाशी बँक खेळ खेळत आहे.नागरिकांचा पैसा असुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्याकडे सुध्दा यंत्रणेचा दुर्लक्ष होत आहे.


No comments