web-banner-lshep2024

Breaking News

Pahalgam Terrorist Attack | पहेलगाम हल्ल्या विरोधात बैलगाडा मैदानात

गौरव शेलार / मुरबाड : पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात बैलप्रेमी सेवाभावी संस्था ठाणे,रायगड, पालघर, मुंबई रस्त्यावर उतरली आहे.ठाणे,रायगड, पालघर, मुंबई जिल्ह्यातील बैलगाडा चालकांनी रस्त्यावर उतरून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.पाकिस्तान विरोधात घोषणा देत शनिवार (दि.26) डोंबिवलीत निषेध करण्यात आला आहे. ठाणे,रायगड, पालघर, मुंबई जिल्ह्यातील शेकडो बैलगाडा चालक मालक डोंबिवलीतील हेदुटणे गावाजवळ एकत्र आले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असून दहशतवाद्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ ठाणे रायगड जिल्ह्यातील बैलगाडा मालक एकत्र आले होते. सर्व बैलगाडा मालकांनी एकत्र येऊन या हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे.

मुरबाड तालुका कमिटी सचिव संदीप वडवले याचा भिंगरी या बैलाने सुद्धा या निषेध मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.यावेळी बैलप्रेमी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  संदीप माली तसेच उपाध्यक्ष नंदराज मुगाजी,उपाध्यक्ष पप्पू पाटील, उपाध्यक्ष आकाश राऊत,मिलिंद पाटील, जयेश पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 


No comments