भाजप,शिवसेना सत्ता उपभोगात, काळू धरण क्षेत्रात बोगस घरपट्टी रॅकेट;मुख्याधिकारी यांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश..!
नामदेव शेलार / मुरबाड : सत्तेचा गैरवापर करून भाजप, शिवसेना सत्ता चा वापर
करून काळू धरण क्षेत्रात बोगस घर पट्ट्या बनवणारी टोळी स्थानिका च्या निदर्शनास आल्यावर
त्यानी शासनाला तक्रारी केल्या होत्या, त्या नुसार जिल्हा परिषद मुखाधिकारी रोहन घुगे
यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, शासनाला कोट्याधवमीचा चुना लावण्याचा डाव आखला असता काळू
धरणाची भरपाई लाटण्यासाठी १२०/बोगस घरपट्टया घुसविल्याचा पडदा फास होताच खुद्द शासनानेदखल घेऊन ठाणे कार्यकारी अधिकारी रोहन
घुगे यांना आदेश पारित करून संबंधीत दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे खात्री लायक वृत्त आहे,
मुरबाडमधील काळूधरणात परिसरातील बुडीत क्षेत्रात येणा-या अनेक गावात सह भोरांडेग्रापपंचायत,
उदाळडोह या ठिकाणी आदिवासींची फक्त २४ घरे
असताना ग्रामपंचायत दप्तरी हेराफेरी करून चक्का १२० बोगस घरपट्टया घुसडल्या होत्या प्रस्तावित प्रकल्पाची कोट्यवधींची भरपाई लाटण्यासाठीच
हा उच्छाद मांडल्याचा जाहिर आरोप जिपचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी करून चौकशीची
मागणी केली होती या धरणबाधीत क्षेत्रात २२ गावे बाधित असून या बुडीत क्षेत्रात शासनाचा निधी हडप करण्याचा नियोजनबद्ध
केलेला प्रयत्न केला गेला असून अन्य गावा मध्येही असाच प्रकार झाल्याने या भ्रष्ट प्रकृती
वर गुन्हा दाखल करण्याची मागणी बाधीत शेतकरी नी करून अंदोलनाचा इशारा दिला आहे.
काळू धरणाची भरपाई लाटण्यासाठी
१२० बोगस घरपट्टया रडारवर, आल्या आहेत शासनाचे कोट्यवधी हडपण्याकरिता ग्रामपंचायत दप्तरी
हेराफेरीकरणारे, सत्ताधारीकार्यकर्ते असल्यामुळे, काय कारवाई होते या बद्दल उत्सुकता
लागली आहे,मुरबाड तालुक्यात काळू धरण बांधण्याची घोषणा २००९ मध्ये करण्यात आली होती.
यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे,
धरण बाधीत क्षेत्रातील भोरांडे ग्रा,पं, हदीतील खुटल, चासोळे, खुर्द (दोन)
आंबिवली, जडई न्याहाडी फांगलोशी वाकलवाडी, करपटवाडी, तळेगांव जडई, खरशेत, उमरोली, फांगणे, ऐनाचीवाडी, ही २२
गावे बाधित होत असून भोराडे, उदालडोह बांगरवाडी,
खुर्द दोन कुडशेत, केव्हारवाडी, झाटघर, मोहवाडी, बनाचीवाडी करपटवाडी, शिसेवाडी दिवानपाडा, साखरवाडी, फांगळगव्हाण
गुलमान, कुंभाळे, पावरवाडी, शिवेचीवाडी,
भिकारवाडी हे आठ पाडे,बुडीत क्षेत्रात येतात.
यातील उदाळडोह पाडयात आदिवाशीची २४ घरे अस्तित्वात
असताना ग्रामपंचायत दप्तरी चक्क १२० अतिरिक्त घरपट्या नोंदविण्याचा पराक्रम केला गेला ही अतिरिका घुसवलेली नावे भाजपा व शिंदे गटातील
धनदांडग्या कार्यकत्यांची असून त्यामध्ये मुरबाडचे तीन माजी सभापती व पंचायत समितीच्या सदस्यांचे नातलग
असल्याचा आरोप होत आहे.
महसूत्र विभागाच्या अधिकान्यांना हाताशी धरून बोगस घररपट्टया तयार करण्यात आल्या असून नातेवाईकांच्या आडून राजकीय नेत्यांनी नुकसानभरपाईची रक्कम हडप करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार यांनी केला होता . बोगसगिरी करण्यांवर फौजदारी गुन्हा दाखाल करा अशी मागणीदेखील त्यांनी केली होती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात या घोटाळ्याचा विधानसभेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते नुकसानभरपाईचे पैसे लाटण्यासाठी या घरणभागात अशा प्रकारचा बोगस घरपट्टी रॅकेट असल्याचा बोललं जात आहे या धरणा साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रही असून स्थानिकांच्या प्रथम मागण्या पूर्ण करा नंतर काळू धरण अशी भूमिका आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे, येतील राजकारणी ठेकेदारी, बोगस घरपट्टी चा फायदा घेऊन आदिवासी, गोरगरीब यांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेऊन अधिकारी वर्गाला मदत करीत आहेत, महसूल, पंचायत, अधिकारी धरणात कमाईचा घर बनवत आहेत
नागरिक व लोकप्रतिनिधीनी केलेल्या
तक्रारीची शासनाकडून दखल घेऊन तसे आदेश आल्याने
सबंधीत दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
( रोहन घुगे - ठाणे जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी)



No comments