कूणबी समाज भिवंडी शहर दिवाळी पहाट उत्साहात साजरी
भिवंडी : दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त दिवाळी पहाटचे आयोजन शनिवारी सकाळी ६ वाजता करण्यात आले. कूणबी समाज भिवंडी शहर यांच्या वतीने कै यमूनाबाई भेरे सभागृहात आयोजित केलेल्या दिवाली पहाट संगीतमय मेजवानीमध्ये तेजस काठवले यांच्या मूझीक बॅडने जून्या गाण्यांची संगीतमय प्रस्तूती केली.
यावेळी महिलांनी आपल्या सूमधूर आवाजात गाणी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले,महिला करीता २५ लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे गिफ्ट, वाटप करण्यात आले तर, श्री चिंतामणी ज्वेलर्स भिवंडी रोहन गोळे,यांच्यावतीने २५ , जान्हवी कलेक्शन भिवंडी नरेश निपूर्त यांच्यावतीने १५ कुटुंबांना भेटवस्तू वकील संघटनेचे अध्यक्ष अँड दिनेश्वर पाटील, डॉ नितीन मोकाशी, रोहन गोळे, उद्योगपती नरेश निपूर्ते अँड मंजित राऊत, अँड यूवराज पाटील, डॉ नूतन नितीन मोकाशी, अँड निलेश पाटील, अँड स्वप्निल भोईर नगरसेवक महेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष संजय भेरे, सचिव दिलीप खाने, उपाध्यक्ष अजय वरकूटे, खजिनदार अविनाश काठवले सदस्य संजय भगत नूतन मोकाशी स्वाती भावार्थ, पूनम घाडगे,भाऊ काठवले, आशिष खारेकर, राजेश मूढे संदेश शेलार, भारती चौधरी नितीन काठवले राजेश घाडगे तूषार खारेकर सिद्धार्थ खाने राजेश मडके पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला,सञसंचालन डॉ नूतन मोकाशी यांनी केले,
No comments