आपल्याला एकच आधार आमदार किसन कथोरे पुन्हा विजयाचा शिल्पकार दोन्ही बैलांच्या कासरा कथोरे यांच्या हातात दीपावली सणाचा आनंद लुटला..!
नामदेव शेलार/ बदलापूर : प्रत्येक निवडणुकीत विजयाचा
शिल्पकार ठरलेले आपल्याला एकच आधार असलेले आमदार किसन कथोरे यांनी
पारंपारिक दीपावलीतील बळीराजाच्या सानिध्यात दीपावलीचा सण साजरा केला आहे.
प्रत्येक
खेड्यापाड्यात आजही बैलांची झुंज तोंडग्याची झुंज अखंडित राबवली जाते
परंतु आजच्या कालखंडात खिल्लारी बैल जोडी छकऱ्यांच्या स्पर्धेत जास्त दिसते
वर्षातून एकदा येणाऱ्या दीपावलीला त्यांना सजावट केली जाते बैलांना
रंगरंगोटी करून कितीही त्रास दिला तरी त्यांची पूजा केली जाते अशाच
खिल्लारी बैल दीपावलीच्या सणात आमदार किसन कथोरे यांच्या समोर उभे केले
मात्र त्या दोघाही बैलांचा कासरा (पांगा) दोन्हीही हातात धरून त्यांना
आवरण्याचा प्रयत्न आमदार किसन कथोरे यांनी करून सर्व उपस्थितांच्या समोर
अशा बैलांचा पालन आपण यापूर्वीच केले असल्याचे दाखवून दिले.
प्रत्येक
मुक्या जनावराच्या पालन करण्याचा छंद त्यांनी जोपासला असताना हातात कासरा
धरलेले बैलांना लोक घाबरतात काहीही करू शकतात हा गैरसमज आमदार किसन कथोरे
यांनी प्रत्येकाच्या मनातून हद्दपार केल्याचे दाखवले आहे शर्यतीचे दोन्हीही
बैल आहेत मात्र आमदार किसन कथोरे यांना शर्यत नवीन वाटत नाही अनेक शर्यतीत
त्यांचा झालेला विजयातून त्यांची भिडचीप झाली आहे म्हणूनच बिनधास्त
दोन्हीही शर्यतीच्या बैलांच्या कासरा हातात धरून आनंद लुटला आहे.
दीपावली
सणात विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत मुरबाड विधानसभेत प्रचाराचे वारे
वाहत आहेत याच निवडणुकीत आमदार किसन कथोरे निवडणूक लढवत असताना त्यांनी
भीती न पत्करता दोन्हीही खिल्लारी बैलांचे कासरे हातात धरून एका सुंदर
बैलाला जाग्यावरच थांबवल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहे.
दीपावली
सणात नागरिकांना शुभेच्छा दरवर्षी देत असतात परंतु येत्या वर्षी आमदार
किसन कथोरे यांनी गावागावात बळी सर्जा राजाला आगीतून उड्या मारून नेण्याची
परंपरा प्रथा जोपासली जाते त्याच्यात सहभागी होऊन नागरिकांशी हितगुज साधला
प्रत्येक घराघरात दीपावली सण साजरा होत असताना दुसरीकडे निवडणुकीच्या
प्रचाराचा धुराळा उडाला आहे उमेदवार प्रत्येक निमंत्रित कार्यक्रमात राहून
आपल्या प्रचाराचा एक प्रकारे संदेश देतात मात्र दीपावलीत सर्वात जास्त
आकर्षित ठरते बैलांची टोणग्यांची झुंज खेड्यापाड्यात अशा झुंजी रंगले आहेत
हे पाहण्यास मिळाले.
No comments