"मुरबाड मध्ये निसर्ग कोपला" पाण्यासाठी हा..हा..कार दोन दिवस बत्ती गुल मदतीसाठी याचना चमकोगिरीवाले पसार सामान्यांचे लोकप्रतिनिधींना साकडे ( इनसाईड स्टोरी "ना धुण्याला ना पिण्याला पाणी" )
नामदेव शेलार / मुरबाड,ठाणे : काही दिवसापूर्वी सर्वांनी परदेशात पाहिलेली पूरहाणीची कहाणी आणि युक्रेन रशिया युद्धात प्रत्यक्षात पाहिलेली परिस्थिती जशी धक्कादायक होती अशीच खेदजनक परिस्थिती हजारो कोटीची उडाणे घेणाऱ्या मुरबाड मध्ये घडली आहे.
एका क्षणात होत्याचं नव्हतं करून तो गेला मात्र गरिबांच्या सर्वसामान्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आपुलकीचेच लोक धावले पण कर्तुत्वामध्ये कसूर करणाऱ्या विद्युत महामंडळाच्या हलगर्जी बेजबाबदारामुळे संपूर्ण मुरबाड शहर परिसर अंधाराच्या छत्रछायेखाली झोपला बाथरूम मध्ये धुण्यासाठी पाणी नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही मोबाईल सह सर्व यंत्रणा बंद झाल्या पाण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात नागरिकांना जावं लागलं मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला त्या वादळात मुरबाड शहर आणि परिसरातील अनेक विद्युत पोल तुटले वाकले तारा तुटून पडल्या मोठी जीवित हानी टळली शेकडो झाडे रस्त्यावर घरावर पडली घराचे पत्रे छप्पर उडाले धावपळ सुरू झाली एकामेकाला मदत करण्यासाठी लोकं सैरे वैर पळत होते लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून लोकांचे नुकसान झाले घटनास्थळी तहसीलदार अभिजीत देशमुख पोलीस निरीक्षक कामत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे विद्युत मंडळाचे अधिकारी कर्मचारी धावून जेसीबी ट्रॅक्टर अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावरील अडथळे दूर केले नगरसेवक अक्षय रोठे यांनी प्रभाग सात मधील प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन नुकसानीचा पंचनामे केली दिवसभर विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत फिरून विजेसाठी प्रयत्न केले मात्र विद्युत मंडळाच्या मनमानी भ्रष्ट कारभाराने मुरबाडच्या नागरिकांना पाण्यासाठी अंधारात धावपळ करावी लागली बाथरूम मध्ये पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती मुरबाडमध्ये उद्भवली आहे.
कोणी पाणी देतं का पाणी अशी ओरड सुरू झाली सर्व यंत्रणा हातबल झाल्या आम्ही खासदार आमदार नगरसेवक विद्युत मंडळ नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधला काही बोलले नाही काही कव्हरेज क्षेत्राबाहेर होते काहींनी उंटावरून शेळ्या हाकल्या मात्र विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक भयानक चूक केली याच मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा केला.
सकाळपासून विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मुरबाडच्या विद्युत पोल तारा लाईनचे काम केले असते तर आम्ही संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करू शकलो असतो त्या हातबळींवर आम्ही पूर्णविराम दिला.
त्यानंतर थेट युवा नेते सुभाषदादा पवार यांना संपर्क केला दादा मुरबाड शहरातील लोक हतबळ झाले आहेत त्यांच्यावर विजेमुळे भीषण पाण्याचा संकट आला आहे.आपली मदत कशी होईल त्यावर सुभाष पवार यांनी सांगितले एक लाईन तात्काळ सुरू केली आहे.दुसरी सुद्धा होईल असे मला सांगितले मात्र मी पुन्हा त्यांच्या संपर्कात आहे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो असे आमच्याशी बोलताना सांगितले.
आमदार किसन कथोरे यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही खासदार बाल्यामामा म्हात्रे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांच्याशी सुद्धा संपर्क साधला मात्र कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही त्यावेळी समोर एकच शब्द आला "फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळ आकाश" विज नसल्याने बोरिंग बंद,नळ पाईपलाईन बंद साऱ्या गावांमधील बिसलरी बाटल्या संपल्या मोठ्या बाटल्या वाल्यांचा भाव वाढला विज नसल्याने पाणी भरण्याचे पंप बंद पडले आंघोळ सोडाच स्वयंपाकासाठी बिसलरीचे पाणी विकत घ्यावे लागले मोबाईलची बॅटरी संपली वायफाय बंद झाले इंटरनेट सेवा बंद पडली नवरात्र उत्सव बंद पडला ग्रामीण रुग्णालयासह सर्वच रुग्णालयांची अवस्था बिकट झाली.
हॉटेल धाबे वडापाव पासून सगळ्यांच व्यवसायावर गंभीर परिणाम झाला कधी आला नाही असा संकट मुरबाड करांवर उभा राहिला परंतु अंधारात बिगर पाण्याविना तडफडला तो स्थानिक नागरिक काही पुढारपणा करून समाजसेवेचा आव आणणारी पळकुटे मुरबाड सोडून पळाले लोकांना वीज पाणी देण्यासाठी अंधाराच्या छायेत दिसले नाही.
शेकडो कोटीची विद्युत योजना फेल ठरली गरिबांची मतासाठी थट्टा करणाऱ्यांना एक दिवस निसर्ग माफ करणार नाही नियतीचा खेळ अंधारात नाही उजेडात चालतो अशा भावना गरीब नागरिकांनी व्यक्त केल्या.
मुरबाडवर आलेला वीज,पाणी संकट भयानक आहे मदतीला लष्करांची गरज लागेल एवढी मोठी आव्हाने लोकांसमोर उभी आहेत मात्र मदतीला येतोय कोण कोण पाणी अन्न वाटणार गरिबांना अंधारात ठेवण्याची सवयी राज्यकर्त्यांना नेहमीच आहे पुढे पुढे करणाऱ्यांना आमदार खासदार निवडून देण्यासाठी लोकांना प्रेशराईज करतात त्यांनी काय केलं त्याची विचारणा करून प्रत्यक्ष पाहणी करावी.
लोकप्रतिनिधींना अधिकारी फा-वर मारतात विद्युत मंडळाच्या कर्मचारी वर्गात वाढ झाली पाहिजे ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे जुने विद्युत पोल तारा तुटल्या पोल तुटले झाडे पडले याकडे पावसाळापूर्वी लक्ष दिले नाही घटना घडल्यावर धावणारे चमचे अनेक आहेत घटनेची गांभीर्य ओळखणारी ताट कमी आहेत.मुरबाड शहरात पाणीपुरवठा योजना विद्युत मंडळाची पर्यायी उपाय योजना नाही आपत्कालीन यंत्रणा सक्षम नाही लोकांची दिशाभूल करणारे लोकांना आवडत नाहीत मुरबाड शहरात 17 प्रभाग असून 22 हजाराच्यावर मतदार संख्या आहे लाखाच्या वर रहिवाशी आहेत त्यांना दोन दिवस अंधारात पाण्या वाचून ठेवणारे बेजबाबदार अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जाब विचारला पाहिजे पाण्या वाचून तळमळलेला आत्मा कोणाला सन्मान देणार नाही वेळ आल्यावर गाढवालाही बिग बॉसच्या घरात बांधावा लागतो हे आपण बिग बॉसच्या खेळात पाहिले आहे तसाच प्रकार मुरबाड मध्ये अंधाराच्या सावट्यात पाण्यासाठी धडपड करणाऱ्यांना भटकावं लागत आहे.
मुरबाडकर आक्रमक झाल्यावर सुद्धा येण्यापेक्षा अंधाराचे जाळ संपवा पाण्याची वणवण थांबवा आलिशान शहरात राहून मुरबाडकरांच्या समस्यांचा वनवा पेटवू नका गरिबांच्या टाळूवरचा लोणी खाऊ नका समाजसेवेचा सोंग एसी मध्ये झोपून आणू नका निसर्ग कोणालाही माफ करत नाही मात्र शानाच्या अंगाशी किडे रंगसतात अशी भयानक अवस्था मुरबाडकरांची झाली त्याला जबाबदार विद्युत महामंडळ आहे रोज लाईट जाणारी आता दोन दिवस गेली पावसाळ्यापूर्वी झाडे तोडली नाही तीच झाडे वादळात नवरात्र उत्सवात रस्त्यावर पडली पाण्याचा साठा नियोजन नसल्याने पाण्याची समस्या जडली मात्र आम्ही मुरबाडकर शांत आहोत...!
No comments