web-banner-lshep2024

Breaking News

Murbad Rain Update : पावसासह वादळी वाऱ्यामुळे मुरबाड मध्ये विद्युत तारा पोल कोसळून ; घराचे पत्रे उडून नागरिक व्यापाऱ्यांचे नुकसान आपत्कालीन यंत्रणा गायब...!

गौरव शेलार/ मुरबाड : बुधवार दि.९ ते रविवार दि.१३ ऑक्टोबरपर्यंतच्या पाच दिवसाच्या पूर्वघोषित पहिल्या आवर्तनातही संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ हलक्या पावसाची शक्यता (Light Rain) निर्माण झाली आहे. विशेषतः आज बुधवार व गुरुवार दि. ९ व १० ऑक्टोबरला दोन दिवस संपूर्ण विदर्भातील (Vidarbha Rain) ११ जिल्ह्यात तर गुरुवार, शुक्रवार दि १० व ११ ऑक्टोबरला दोन दिवस, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा  १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी  गडगडाटीसह केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.  

काल ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सुसाटयाचा वारा सह पावसाने धुमाकूळ घातला होता.मुरबाड शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन जोगेश्वरी आळी गणेश नगर सह अन्य भागात घराचे पत्रे उडून झाडे घरावर पडून मोठे नुकसान झाले आहे.

 मेन लाईन वरील लाईन सह विद्युत पोल वादळी वाऱ्यामुळे वाकून गेल्याचे चित्र दिसत आहेत.मुरबाड शहरातील लाईट काल रात्री पासून खंडित झाली आहे. संबंधित आपत्कालीन यंत्रणा मात्र कुठे दिसून येते नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

No comments