मुंबईतील 45 शाळांमध्ये 'ViA चाइल्ड रोड सेफ्टी प्रोग्राम' अंतर्गत जनजागृती
मुंबई : युनायटेड वे मुंबई ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था
आहे, जी 130 वर्षांपेक्षा जास्त वर्षे अस्तित्वात असून जगभरातील 45
देशांमध्ये कार्यरत आहे. युनायटेड वे चे ध्येय ग्रामीण पातळीवर काम करून
शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण आणि उत्पन्नाशी संबंधित
मुद्द्यांवर ठोस कृती करणे आहे.सध्या,
आम्ही 'ViA चाइल्ड रोड सेफ्टी प्रोग्राम' युनायटेड वे मुंबई अंतर्गत चालवत
आहोत, जो सार्वजनिक सुरक्षा क्षेत्रात येतो. हा एक आंतरराष्ट्रीय
कार्यक्रम असून जगभरातील 45 देशांमध्ये सक्रिय आहे. तसेच भारतातील सात
शहरांमध्ये तो कार्यरत आहे: चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद, दिल्ली, नाशिक, पुणे
आणि मुंबई. मुंबईतील 45 शाळांमध्ये आम्ही 'ViA चाइल्ड रोड सेफ्टी
प्रोग्राम' अंतर्गत जनजागृती सत्रे आयोजित केली आहेत, जिथे विद्यार्थ्यांना
जागतिक, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र स्तरावरील अपघातांच्या आकडेवारीसह
प्रत्यक्ष ब्लाइंड स्पॉट, डोअरिंग, व्हिजिब्लिटी सारखे रस्ता सुरक्षेशी
संबंधित महत्त्वाचे प्रयोग दाखवून इतर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते .
हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण जगभरात दररोज सुमारे
700 मुलांचा रस्ता अपघातांमध्ये मृत्यू होतो. ही चिंतेची बाब आहे, आणि
आम्ही 6वी, 7वी आणि 8वी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्ये या मुद्द्यांवर
जागरूकता निर्माण करत आहोत, जेणेकरून पुढील पिढी या दुर्दैवी आकडेवारीचा
भाग बनणार नाही असा आमचा विश्वास आहे.
या
कार्यक्रमाद्वारे आम्ही शाळांच्या आसपासच्या रस्ता सुरक्षेशी संबंधित
समस्यांवर देखील काम करत आहोत. या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे या
समस्या आणि त्यांचे उपाय विद्यार्थ्यांकडूनच मिळवणे व त्यानुसार काम करणे.
विद्यार्थ्यांकडून डेमोग्राफिक सर्वेक्षणे करून या समस्यांची पडताळणी
करवून. त्यांना 'सेफ स्ट्रीट्स,' 'सेफ बसेस,' 'सेफ डिस्पर्सल अँड एन्ट्री,'
आणि 'रोड सेफ्टी जर्नालिझम' या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हे
उद्दिष्ट आहे .
युनायटेड
वेतर्फे नुकतेच मुंबईतील अनेक शाळांमधील शिक्षकांना ह्या विषयावर प्रशिक्षण
देण्यात आले आहे. हे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर 3 ऑक्टोबर 2024 रोजी
बांद्रा येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमध्ये आयोजित केले गेले होते,
ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा सहभाग मिळाला. तसेच शिक्षक भारती
संघटनेचे मुंबई अध्यक्ष व RSP चे मुंबई सचिव मा. अशोक शिंदे सर आणि यांची
प्रमुख उपस्थिती आणि . SSM MCM Girls High School च्या प्राध्यापिका मा.
ज्योती राणे मॅडम ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या
नेतृत्वाखालील हा उपक्रम जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, आणि
आम्ही प्रसार माध्यमांच्या मदतीने शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे
उद्दिष्ट असल्याची माहिती युनायटेड वे मुंबई च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
No comments