web-banner-lshep2024

Breaking News

देवीची आळी येथील नागरिक व नगरसेवक अक्षय रोठे यांच्या आंदोलनास यश..!

गौरव शेलार/ मुरबाड : गेली 3 दिवस अंधारात असलेल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये कोणत्याही नेत्यांनी प्रयत्न केले नसताना विदयुत अधिकारी थत्ते, विशे आणि त्याच्या कर्मचारी  कामगार यांनी रात्री उशिरा पर्यंत केलेल्या कामाला यश आले आहे. मुरबाड मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह संपूर्ण मुरबाड शहर अंधारात होते सर्वत्र प्रभागात 2 दिवसात लाईट आली असता प्रभाग क्रमांक 7 मध्ये मात्र 3 दिवस अंधार होता. 

 संतप्त नागरिक तसेच प्रभाग क्रमांक 7 चे युवा नगरसेवक अक्षय रोठे यांच्यासह  प्रभाग मधील नागरिकांनी आज जन मोर्चा काढला होता संबंधित मोर्चा एम एस ई बी ऑफिस मुरबाड येथे गेला असता अधिकाऱ्यांनी सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत लाईट येईल अशा आश्वासन दिले असता रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवून प्रभाग क्रमांक सात मध्ये अंधारात असलेल्या नागरिकांना उजाला देण्याचं काम संबंधित एमएसईबीचे अधिकारी यांनी केले आहे.

या आंदोलनासाठी प्रभागातील नगरसेवक अक्षय रोठे, अशोक विशे, ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार देवीची आळी मधील सर्व युवक आंदोलक सामील झाले होते.आंदोलक यांच्या प्रयत्नाने तीन दिवस अंधार काढलेल्या परिसराला उजाळा मिळाल्याने विदयुत मंडळचे संबंधित आंदोलक प्रभाग क्रमांकचे नगरसेवक अक्षय रोठे यांनी आभार मानले आहेत.

No comments