web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या ठेकेदारांना कामे चांगली करण्याचा आमदारांचा आदेश बोगस कामे केलेले ठेकेदारच आमदारांच्या पुढे पुढे करतात लोकांचा आवाज..!


नामदेव शेलात / मुरबाड :  मंत्रालयाला शेवटचा नतमस्तक करताना 897 कोटीचा निधी मुरबाड मतदार संघासाठी घेऊन आल्याचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे एसटी डेपो इमारत भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले.
147 कोटीचा निधी मुरबाड नगरपंचायतीच्या भुयारी गटारीसाठी मंजूर केला असून त्यामध्ये पाणीपुरवठा योजना रस्त्यांचा समावेश आहे 385 कोटीच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी व्यासपीठावरून सांगितले. 
 1982 पासून एसटी डेपो चा कायापालट झाला नाही त्यासाठी माझे प्रयत्न होते त्याचा शुभारंभ आता झाला आहे ठेकेदारांनी चांगली कामे करावी माझ्याकडे ठेकेदार दलालांना थारा नाही गरीब माणूस आहेत मी जात पक्ष बघून काम करत नाहीत माणसाकडे पाहून काम करतो असे आपल्या भाषणात बोलताना सांगितले मात्र मुरबाड नगरपंचायत मधील छुपी ठेकेदारी करणारे मंजूर कामांची ठेकेदारी करणारे सगळे आमदारांच्या पुढे मागे धावत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक यांनी व्यक्त करून आमदारांनी त्यांच्या छुप्या ठेकेदारीकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 
स्थानिक प्रभागातील कामे शहरात नगरसेवक टक्केवारी किंवा दुसऱ्याच्या एजन्सीवर करतात जिल्हा परिषद पंचायत समिती मजूर फेडरेशनचे पदाधिकारी हेच ठेकेदारी करतात जिकडे सत्ता तिकडे हेलकोट अशी परंपरा माजी आमदार गोटीराम पवार माजी आमदार दिगंबर विशे पासून आमदार किसन कथोरे यांच्याकडे आजही सुरू आहे मात्र सर्वांगीण विकासासाठी सामाजिक नेतृत्व म्हणून आमदार किसन कथोरे यांच्यासोबत काम करत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. 
     मुरबाड तालुक्यातील दोन गटांमधील भांडणे मिटवून शांतता निर्माण केल्याचे सांगून मुरबाड एसटी डेपो 30 इलेक्ट्रिक बसेस एसी चालणार आहेत माझा मुरबाडचा प्रवासी येथून कल्याणला एसी बस मधून गेला पाहिजे अशी भावना असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. प्रत्येक तलाठी सजेला स्वतंत्र कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे कल्याण मुरबाड रस्त्यावरील अपघाती ठिकाणी काढून रस्ता चौपदरी केला पावसाळापूर्वी रायता आणि धानिवली पुलाचे काम पूर्ण होईल जलद गतीने मुरबाडच्या प्रवाशांना कल्याणला सुखरूप जाता येईल मुरबाड कल्याण च्या तीन हात नाका पुलाला स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांचे नाव देण्याची मागणी विधानसभा क्षेत्र विकास मंचाच्या अध्यक्ष ज्योतीताई शेलार यांनी केली होती त्याची दखल घेऊन आमदार किसन कथोरे यांनी उड्डाणपुलाला स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांचे नाव देणार असल्याचे सांगून केंद्रीय दळणवळण कार्यालयातून मंजुरी मिळवली असल्याची माहिती व्यासपीठावरून दिली त्याचं स्वागत विकास मंचच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केले आहे. 
        गोवेली येथील वडोदरा आणि समृद्धीचा रिंगण मुरबाड कल्याण रोडला लागून झाला आहे त्याच ठिकाणी लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी लॉजिस्टिक पार्क हब निर्माण होणार आहेत मुरबाड तालुक्यात सुद्धा लॉजिस्टिक पार्क असे मोठे प्रोजेक्ट येणार आहेत येथे बेरोजगारांना रोजगार मिळेल मुरबाड शहर तालुक्याचा सार्वजनिक विकास होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगताना नवी मुंबई बोर्ड पाडा कर्जत म्हसा रोड लगत नारिवली धसई वरून माळशेज घाटाच्या नाणेघाटातून लातूरला दुसरा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे त्यामुळे मुरबाड एक राष्ट्रीय पातळीवरील रस्त्याशी जोडणारा तालुका गणला जाणार असल्याची माहिती दिली. 
        मुरबाड बारवी डॅम रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासाठी 130 कोटी रुपये मंजूर करून कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे मुरबाड ची जनतेने आमदार किसन कथोरे यांच्या कार्यावर प्रभाव टाकून बिनकामी पुढे पुढे करणारे लोकांची कामे न करणारे दिखाऊ लोकप्रतिनिधी पदाधिकारी बोगस कामे करून लाखो कोटीची बिले काढणारे ठेकेदार दलाल आमच्यावर लादू नका त्यांचा पुढे पुढे शो शायनिंगचा खेळ थांबवा अशी लोकांची अपेक्षा आहे.

No comments