web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड,कल्याण,अंबरनाथ,बदलापूर मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या प्रचार रॅलीत मतदार कार्यकर्त्यांची उच्चांक मोडणारी गर्दी पुन्हा किसन कथोरे यांना संधी गावोगावी मतदार गावात विकासाचा गोडवा..!

नामदेव शेलार / मुरबाड :  गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक वाड्यावर त्या गावे शहरात काँक्रिटी रस्ते पिण्याचे पाणी पुल साकव एसटी बस सेवा वीज रुग्णांना तात्काळ मदत वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या माणसं गुरांच्या नातेवाईकांना शासनाकडून भरपाई लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना दिलेली मदत घरकुले अशी अनेक कामे करणारे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारात आम्ही सर्व मतदार कार्यकर्ते सामील होत असल्याचे मतदारांनी सांगितले. 
 

आमदार किसन कथोरे यांची प्रचार रॅली प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गटात शहरातील वार्डात फिरून मतदारांशी संपर्क साधला 40 वर्षाच्या काळा मधील अपेक्षित विकास कामासाठी हजारो कोटी निधी आणलेला आमदार किसन कथोरे आम्हाला हवा येत्या पाच वर्षात मुरबाडचा भरीव विकास होईल रस्ते रेल्वेची समस्या मार्गी लागेल एमआयडीसी गोडाऊन येतील त्यासाठी आमदार किसन कथोरे यांना पाठबळ देणे क्रम प्राप्त आहे त्यांच्यासमोर कोण उमेदवार आहे त्याच्याकडे पहात नाहीत अशा प्रतिक्रिया प्रचार रॅलीत मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. लोकसभेत भाजपाच्या खासदारांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या मतदार कार्यकर्त्यांचा लीड होता तसेच अपक्ष उमेदवार आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाल्यामामा म्हात्रे यांना मिळालेली मते 90% आमदार किसन कथोरे यांना मानणाऱ्या मतदारांची होती ही सर्व मते आमदार किसन कथोरे यांच्या पारड्यात पडतील अशी चर्चा आहे. 
माळ मोरोशी तळेगाव फागुळगव्हाण मोरोशी सरळगाव धसई  शिरवली कोलठण शिवळे पवाळे  वाघिवली असोसे घोरले देवगाव धानिवली कुडवली मुरबाड परिसर आणि मुरबाड शहरात सर्वत्र आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारात मतदारांची गर्दी झाली होती तेव्हा येथील विकास झालाच आहे मात्र शासनाच्या योजनेचा लाभ पासून काही वंचित राहिलेल्या लाभार्थींना योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्या पुढे आल्या त्याची पूर्तता निवडणूक आचारसंहिता संपल्यावर करण्याचे अभिवचन आमदार किसन कथोरे यांनी दिले आहे. 
 
ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे कोणत्याही मतदार नागरिक यांची नाराजी आमदार किसन कथोरे यांच्यावर नाही थेट आमदार किसन कथोरे यांच्याशी मतदार नागरिक संपर्क करून कामे करून घेतात त्यामुळे ठेकेदार दलालांना थारा उरलेला नाही गेल्या निवडणुकीपेक्षा मतदान बहुमत आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो मात्र आमदार किसन कथोरे हेच निवडून येणार आहेत त्यांच्यासमोर सामान्य लोकांची कामे करणारा उमेदवार रिंगणात नाही ज्यांनी कधी मतदार सामान्य नागरिकांना विचारले नाहीत त्यांनी हात जोडून काय उपयोग गरिबांचा आमदार आम्हाला हवा आहे श्रीमंत ठेकेदार उमेदवाराकडे नेहमीच मतदारांनी दुर्लक्ष केली आहे असा गोडवा मतदारांनी गाव वाड्या-पाड्यात गाऊन कथोरे यांचा प्रत्येक ठिकाणी स्वागत केले आहे.

No comments