महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या टिटवाळ्यातील सलग दुसऱ्या प्रचार फेरीला प्रचंड गर्दी
नामदेव शेलार / कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा
मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या
महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास
सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी मांडा टिटवाळा
परिसरात प्रचार फेरी काढून स्थानिक जनतेशी संवाद साधला.
मतदारसंघात
झालेल्या विकासकामांची माहिती देत आणखी एक संधी देत पुन्हा एकदा निवडून
देण्याचे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी मांडा टिटवाळा
येथील प्रभाग क्रमांक 8, आजूबाजूच्या परिसरात दिवसभर प्रचारफेरीच्या
माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख
अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, संजय पाटील, मा.नगरसेवक संतोष
तरे, उपशहर प्रमुख विजय देशेकर, युवासेना उपशहर प्रमुख विकास भोय,
यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments