विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ठाणे जिल्ह्यातील 72 लाख 29 हजार 339 मतदार करणार मतदान
गौरव, शेलार / मुरबाड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.
ठाणे जिल्ह्यात 134-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), 135-शहापूर (अ.ज.), 136-भिवंडी
पश्चिम, 137-भिवंडी पूर्व, 138-कल्याण पश्चिम, 139-मुरबाड, 140-अंबरनाथ
(अ.जा.), 141-उल्हासनगर, 142-कल्याण पूर्व, 143-डोंबिवली, 144-कल्याण
ग्रामीण, 145-मिरा भाईंदर, 146-ओवळा माजिवाडा, 147-कोपरी पाचपाखाडी,
148-ठाणे, 149-मुंब्रा कळवा, 150-ऐरोली, 151-बेलापूर असे 18 विधानसभा
मतदारसंघ आहेत.
मतदारसंघाचे एकूण मतदार:-
ठाणे जिल्ह्यात दि.29 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 72 लाख 29 हजार 339
मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार: 38 लाख 45 हजार 42, महिला मतदार: 33 लाख
82 हजार 882, इतर/तृतीयपंथी मतदार: 1 हजार 415 आहेत. तसेच यामध्ये सैनिक
मतदार: 1 हजार 603, एनआरआय मतदार: 979, दिव्यांग 38 हजार 149, 18-19
वयोगटातील 1 लाख 72 हजार 981 मतदार तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 56 हजार
976 मतदार आहेत.
पात्र मतदारांनी जास्तीत जास्त
संख्येने दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
करिता मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.
No comments