web-banner-lshep2024

Breaking News

गोलंदाज फलंदाज यांची विकेट कीपर करणार दांडीगुल,लाखो मतदार चाहत्यांनी आमदार किसन कथोरे यांना मैदानात दिला एकमताने आशीर्वाद...!


नामदेव शेलार / मुरबाड : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे मुरबाड विधानसभेत प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्ग भागातील वाड्या-पाडे वस्त्यांमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या भाजपाच्या कमळ निशाणी वर शिक्का मारून मला विजयी करा असा प्रचार आमदार किसन कथोरे करत आहेत मुरबाड विधानसभेत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात भाजपाचे किसन कथोरे यांची दुरंगी लढत महत्त्वाची मानली जाते परंतु त्याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष यांनी बंडखोरी करून फलंदाजी पत्करली आहे एका बाजूला गोलंदाज त्यांच्या विरोधात त्याच पक्षाच्या फलंदाज लढत असून भाजपाचे तीन वेळा आमदार असलेले किसन कथोरे विकेटकीपरच्या भूमिकेत आपला प्रचाराचा ओघ वाढवत आहेत जसे क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज फलंदाजांची दांडी गुल करतात असाच विकेटकीपरला चहात्यांनी घेरले आहे.
 
आमदार किसन कथोरे यांनी अनेकांच्या विकेट राजकारणात घेतल्या असल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत मैदान मारण्यासाठी एक मताने आशीर्वाद दिला जात आहे त्यामुळे मुरबाडच्या विधानसभा क्षेत्रात आमदारकी लढतील रंगत आली आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघात बदलापूरशहरात 2लाख 25 हजाराच्या आसपास मतदान असून अंबरनाथ ग्रामीणमध्ये 50 हजाराच्या वर मतदार संख्या आहे हा आमदार किसन कथोरे यांचा बालेकिल्ला असून सलग चार वेळा तेथून बहुमताचा आकडा ओलांडला आहे तर मुरबाड कल्याण ग्रामीणमध्ये दोन लाख दहा हजाराच्या आसपास मतदारसंघ असून तेथे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत गेल्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी 1 लाख 60000 च्या वर मताधिक्य मिळवले होते त्यावेळी 40,000 मताधिक्य राष्ट्रवादी पक्षाचे प्रमोद हिंदूराव यांना मिळाले होते तेच या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. 
 
मुरबाड मध्ये गोटीराम भाऊ पवार यांचे प्राबल्य होते मात्र त्यांच्या मुलांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन भाजपाला मते दिली होती त्याच मतदारांना साकडे घालण्याची वेळ आल्याने राजकारणाचे वाहते वारे लोकाभिमुख सामाजिक कामासाठी की सत्तेच्या खुर्चीसाठी असा सवाल मतदारांकडून विचारला जात आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोटीराम भाऊ पवार गटांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुरेश बाल्या मामा म्हात्रे यांच्या विरोधात काम केले त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत कोणाची दांडी गुल करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून असल्यामुळे खासदार बाल्या मामा म्हात्रे आमदार किसन कथोरे यांच्या अदृश्य शक्तीची परतफेड कशी करतात याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. 
मुरबाड विधानसभेत प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची वैयक्तिक मताधिक्य दहा ते पंधरा हजार असून जाती-नाती भावकी मैत्रीची मताधिक्य 20000 च्या वर आजपर्यंत गेलेली नाही त्यामध्ये पक्षाच्या युती आघाडीची मताधिक्य शक्ती 20 हजाराच्या आसपास असल्याने आतापर्यंत प्रत्येक विरोधक उमेदवार 40 ते 46000 मतांपर्यंत पराभवाला सामोर गेला आहे अशा प्रत्येक निवडणुकीत स्पीड मेकर आमदार किसन कथोरे नेहमीच लीडच्या चर्चेत राहून गेले आहेत खासदारकीला भाजपाच्या विरोधात आदर्श शक्तीचा हात होता म्हणून शरदचंद्र पवार गटाचा खासदाराचा विजय झाला मात्र विधानसभेला हाच प्रकार भाजपामधील अदृश्य शक्ती भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्याच विरोधात काम करून शरदचंद्र पवार गटाच्या आमदार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत असल्याचे मतदारात बोलले जात आहे. 
 
गेले 50 वर्षात नेत्यांच्या समर्थक कार्यकर्ते ठेकेदारावर तीव्र नाराजी आहेच मात्र राजकारणात पक्षीय बळाबळानुसार प्रत्येक निवडणुकीत 40% विरोध सत्ताधाऱ्यांना असतोच त्याचा स्पीड वाढवण्याचे काम मागील निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी केले आहे पण येत्या निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असून गोलंदाज विरोधात फलंदाज भूमिका लक्षात घेऊन भाजपाचे आमदार किसन कथोरे चातुर्य बुद्धीने विकेटकीपरची भूमिका बजावून लाखो मतदार चाहत्यांचे मने जिंकण्याच्या तयारीत आहेत बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण मुरबाड मधील प्रत्येक गावे वाड्यावाड्यात शहरांमध्ये प्रचाराची धामधूम रस्त्यावर धुरळा उडवत आहेत.
  
 यापूर्वी अन्न वस्त्र निवारा यावरच भागून जाणारे शितोरे आजच्या निवडणुकीत वीज पाणी रोजगार शेती भूमीहित आरोग्य याकडे वळली आहे त्यामध्ये पन्नास वर्षे कुठे गेली कळलीच नाहीत मात्र पंधरा वर्षात केलेल्या विकास कामे प्रकल्प योजना सुरक्षित भावी आढावा याचा विकास पर्व आमदार किसन कथोरे मतदारांना घरोघरी वाटप करून विकेटकीपर म्हणून मतदार चाहत्यांच्या आशीर्वाद घेत आहेत दुसरीकडे मागील 30 वर्षाचा सत्ता काळ विसरून गेल्या पंधरा वर्षात भाजपाने काय केलं याचा हिशोब गोलंदाज फलंदाज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी मागत आहेत परंतु सगळे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी चर्चा मतदारात केली जात आहे.

No comments