web-banner-lshep2024

Breaking News

शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात जागोजागी स्वागत विकासाच्या मुद्द्यावर भर...!

 

नामदेव शेलार / कल्याण,ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा कल्याण पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे सर्वसामान्य गोरगरीब मतदार कार्यकर्ते जनतेशी घरोबाचे संबंध सार्वजनिक विकास मदत कार्याने झाले आहेत त्यांचा उत्साह निवडणुकीच्या प्रचारात पाहण्यास मिळत आहे. 

कल्याण आधारवाडी उंबर्डे कोळीवली सापर्डे परिसरात गेली अनेक वर्ष सामाजिक सेवा करून शिवसेना संघटना वाढवण्याचे काम आमदार विश्वनाथ भोईर त्यांचे बंधू मा. नगरसेवक प्रभुनाथ भोईर, मा. नगरसेवक जयवंत भोईर यांनी केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ भोईर यांना नांदप टिटवाळ्यापासून आंबिवली कल्याण पर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने त्यांचा विजय झाला येत्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काँक्रिटी रस्ते गटारी वाढते व्यापारीकरण पाणीपुरवठा योजना सुलभ शौचालय विद्युत पुरवठा शासकीय योजनेचा प्रत्येक घटकाला लाभ देऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवून मतदार नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात जेष्ठ नागरिक महिला युवकांचा सहभाग वाढला असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. 

उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता अत्यंत मनमिळावू प्रत्येकाचं काम तात्काळ निस्वार्थी करणारे ग्रामीण भागातील गाववाल्यांचा हक्काचा शहरी भागातील लोकांचा अत्यंत विश्वासू म्हणून ओळखणारे विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात स्वतः मतदार कार्यकर्ते सहभागी होत आहेत स्थानिकांना शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि भविष्यामधील नवीन प्रकल्प ग्रामीण भागाचा अपूर्ण राहिलेला विकासाचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

No comments