मुरबाड मधील गरीब घरामधील आमदार बनवणार गोडाऊन उभारणीतून रोजगार देणार ''विकासप्रकल्प'' हा माझा छंद आमदार किसन कथोरे यांचे उदगार..!
नामदेव शेलार / मुरबाड : अति दुर्गम भागातील माझ्या
मुरबाडचा सर्वांगीण विकास करणं तरुणांना रोजगार उच्च शिक्षण व्यवसाय आणि
भयमुक्त मुरबाड विधानसभा करणे ही माझी जबाबदारी असल्याचे आमदार किसन कथोरे
यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले. हजारो
नागरिक मतदारांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी भरल्यावर आमदार किसन कथोरे
यांनी नागरिक पत्रकारांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना पत्रकारांशी
वार्तालाप साधला माझ्यासमोर कोणत्याही उमेदवाराचे आव्हान नाही मुरबाड मतदार
संघामधील गोरगरीब जनता मतदार जेष्ठ नागरिक महिला पुरुष युवक यांनी मला
दिलेला आशीर्वाद त्यांच्या मनासारखा मुरबाड घडवणे हेच माझ्यासमोर आव्हान
आहे. हाच आव्हान स्वीकारून पुढच्या काळात मंजूर
झालेले प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे आमदार किसन कथोरे यांनी
बोलताना सांगितले.
स्वातंत्र्यापासून 2009 पर्यंत
असलेली मतदार नागरिकांची नाराजी दूर करून गेल्या पंधरा वर्षात पाणीटंचाई
भाषवून दिली नाही मुरबाड मधील पाणी आरोग्य रस्ते वीज व्यावसाय शिक्षण दहशत
दादागिरीचे भय भ्रष्ट कारभार मनमानी प्रशासन या समस्या सोडवल्याने कल्याण
बदलापूर लगतच्या शहरी भागात होणारे स्थलांतर थांबवले मुरबाडचे नेतेगिरी
करणारे लोक उमेदवार कल्याणला राहण्यासाठी गेले फक्त निवडणुकी लढवण्यापुरते
मुरबाडला येतात मात्र मी बदलापूर सोडून मुरबाड ला येऊन राहिलो चार दिवस
बदलापूर चार दिवस मुरबाडला वेळ देऊन प्रत्येक समस्या सोडवण्याचा काम केला
मी स्वतः ठेकेदार नाही माझ्या कालावधीत आलेल्या निधीची ठेकेदारी ज्यांनी
केली त्यांनी विकास काय केला हे विचारणे उचित ठरणार नाही माझ्याकडे असणारा
गरीब कार्यकर्ता मतदार माझ्याशी थेट बोलतो रात्री दिवसा केव्हाही लोक
माझ्याशी बोलतात माझ्याकडे दलाल ठेकेदार नाहीत त्यामुळे झालेला मतदारसंघाचा
विकास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे तोच विकास टीका करणाऱ्यांना 40 वर्षात
करता आला नाही.
मुरबाड मध्ये माझं आगमन
होण्यापूर्वी प्रचंड दहशतीच वातावरण होतं माझ्या विरोधात निवडणुकीपुरते
बोलणार्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन देत नव्हते गावागावात
भावाभावात भांडणे होती त्यावर त्यांचे चाळीस वर्षे निघून गेली परंतु माझ्या
कालावधीत पोलिसात जाणाऱ्या केसेस कमी झाल्या तंटामुक्ती यशस्वी झाली महिला
मुली नागरीक भयभीत मुक्त झाले महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला पुढील
50 वर्ष पाण्याची व्यवस्था करून उच्च शिक्षणाची सोय केली देश राज्याला
जोडणारे रस्त्याचे जाळे पसरले हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून दिला येत्या
पाच वर्षात मुरबाड विधानसभा मतदारसंघात गोडाऊन हब एमआयडीसी प्रकल्प येणार
आहेत.
त्यामधून लाखो युवकांना स्थानिक नोकऱ्या देण्याची मनोकामना पूर्ण
होणार आहे असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले माझ्याकडून कोणावर
टीकाटिपणी होत नाही माझ्या वाढदिवसाला हजारो लोक शुभेच्छा देण्यासाठी येतात
तेव्हा निवडणुका नसतात तोच माझा लीड आहे. माझ्या बदलापूर अंबरनाथ मध्ये 2
लाख 60 हजाराच्या वर मतदार संख्या असून माझ्या मुरबाडमध्ये मुरबाड 1 लाख 60
हजार कल्याण ग्रामीणमध्ये 50 हजार मतदार संख्या आहे यावरून माझा लीड
लक्षात येईल असेही कथोरे म्हणाले.
No comments