web-banner-lshep2024

Breaking News

माजी आमदार गोटीराम पवार यांचा मुरबाड मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल कथोरे पवार सामना रंगणार..!

नामदेव शेलार / मुरबाड : 2009 मध्ये किसन कथोरे विरोधात अपक्ष गोटीराम पवार यांची जंगी लढत झाली होती तेव्हा 4000 मतांनी राष्ट्रवादी मधून किसन कथोरे विजयी झाले होते हीच लढाई पुन्हा मुरबाड विधानसभा मतदारसंघात यावेळी पाहण्यास मिळणार आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीतून सुभाष पवार यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुरंगी अटीतटीची लढत होणार अशी चर्चा असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार गोटीराम पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने एकच खळबळ राजकारणात उडाली आहे. 
 
मुरबाड विधानसभा मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत मात्र त्यांच्याकडे कोणीही चर्चेने पहात नाही परंतु भाजपाच्या आमदार किसन कथोरे यांच्यासमोर तोला मोलाचा माजी आमदार गोटीराम पवार निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष पुढे आल्याने मतदार संघात खळबळ उडाली आहे. 
 
मुलाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुटुंब गर्दी जमली असताना गोटीराम पवार यांनी एक नाम निर्देशन पत्र राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्षातून तर दुसरा उमेदवारी अर्ज अपक्ष भरला आहे परंतु एबी फॉर्म कोणाला मिळतोय याचे कारण गुलदस्त्यात आहे दोन वेळा आमदार किसन कथोरे यांच्यासमोर निवडणूक लढवून पराभूत झाले त्याचा वचपा काढण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला की सुभाष पवार यांच्या उमेदवारी एबी फॉर्म फिरवला जाणार या चर्चेला उधाण आले आहे.
 
 मुरबाड विधानसभेत पहिल्यांदाच मुलाविरुद्ध बाप उमेदवारी लढत होणार आहे की माजी आमदारांचा उमेदवारी अर्ज डमी आहे का शरद पवार गटाच्या उमेदवारीची हमी नाही अशी चर्चा मतदारसंघात केली जात असून उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची तारीख संपल्यावरच याचे स्पष्टीकरण मतदारांसमोर येणार असल्याचे बोलले जाते मात्र माजी आमदार गोटीराम पवार निवडणूक रिंगणात आल्यास आमदार किसन कथोरे यांना आवाहन ठरणार असे मतदारात बोलले जात आहे.

No comments