शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये पाच दिवसीय संगणक विभागाची सिलेनियम वेबड्रायव्हर ऑटोमेशन कार्यशाळा संपन्न
ओतुर : गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक २/८/२०२४ ते मंगळवार दिनांक६/८/२०२४ रोजी सिलेनियम वेब ड्रायव्हर ऑटोमेशन टेस्टिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मा . श्री योगेश नांगरे (सीनियर टेस्ट इंजिनिअर केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात संगणक विभाग प्रमुख डॉ सुनील खताळ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकमुनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बानखिले मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव आयक्यूएसी समन्वयक डॉ मोनिका रोकडे प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक सिद्धार्थ पानसरे कार्यशाळा समन्वयक डॉ पूजा घोलप प्राध्यापक काजल फापाळे प्राध्यापक राजेंद्र डुंबरे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यशाळेमध्ये ऑटोमेशन चाचणीच्या मूलभूत गोष्टींचा परिचय आणि त्यांचे फायदे तसेच विविध प्रकारच्या चाचण्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिला गेला आणि सेलेनियम वेबड्रायव्हर आणि त्यांच्या घटकांची ओळख करून दिली त्याचप्रमाणे स्वयंचलित प्रगत तंत्र आणि फ्रेम वर्कसह चाचणी ऑटोमेशनसाठी सर्वोत्तम पद्धत विद्यार्थ्यांना शिकविली . व्यवहारिक प्रात्यक्षिकांनी आणि वास्तविक जगातील परिस्थिती यांचा अनुभव सांगून त्याबद्दल शिलेनियम वेबड्रायव्हर बद्दलची विद्यार्थ्यांची समज कार्यशाळेमार्फत नांगरे यांनी विद्यार्थ्यामध्ये वाढवली .
कार्यशाळेच्या माध्यमातून जावा डेव्हलपमेंट किट इंटरनेट डेव्हलपमेंट इन्व्हरमेंट आणि सेलेनियम वेबड्रायव्हर या सारख्या आवश्यक साधनांचा स्थापनेसह विविध प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या . या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांनी ॲटोमेशन टेस्टिंग यशस्वीरित्या संगणकावर करून त्याचे परिणाम समजाणून सांगितले यामुळे विद्यार्थ्यांचे एप्लीकेशन प्रोग्रॅम इंटरफेसचे ज्ञान वाढले . त्यानंतर विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमुळे प्रकल्प सादरीकरण तसेच उद्योगांमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त माहिती मिळाली आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकऱ्यांसाठी व मुलाखतीसाठी कंपनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठा फायदा होईल . या पाच दिवसीय कार्यशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद त्याचप्रमाणे अभिप्राय दिला .शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ सुनील खताळ यांनी केले .
No comments