web-banner-lshep2024

Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे महानगरपालिकेने लाटली 87 एकर गुरचरण जमीन;ग्रामस्थांचा आतकोली पठारवरील कचरा डेपो प्रकल्पाला तीव्र विरोध आत्मदहनाचा इशारा...!


गौरव शेलार / ठाणे : आतकोली पठारावर तळवली भादाने वाशेरे आमने पिसे चिराडपाडा आतकोली गावांमधील गुरांना चारा उपलब्ध करून देणारी महसूल खात्याची गुरचरण जागा 87 एकर ठाणे महानगरपालिकेने कचरा डेपो व्यवस्थापनासाठी हडप केली आहे. परिसरातील ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव घेऊन तसेच लगतच्या शेतकऱ्यांनी येथे उभारण्यात येणाऱ्या कचरा डेपोला तीव्र विरोध करून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

      50 किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागात ठाणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापन डम्पिंग ग्राउंड साठी 12 हेक्टर ची मागणी केली होती मात्र तेथील 34 हेक्टर जमीन ठाणे महानगरपालिकेने कचरा विल्हेवाट नावाखाली हडप केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समृद्धी महामार्गाचे रिंगण लाखो क्रिकेट प्रेमींसाठी उभारण्यात येणारे क्रिकेट स्टेडियम जवळच मुंबईला पाणीपुरवठा करणारे पिसे डॅम धरण जिल्हा पोलीस अध्यक्ष कार्यालयाची जमीन आणि चौफेर 3000 लोकांची वस्ती असलेली अनेक गावे आहेत त्याला लागून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड नागरिकांना आरोग्यास धोकादायक असून परिसरातील शेती नापीक रोग युक्त होणार आहे.

     कचरा डेपो प्रकल्पाला लागून वेअर हाऊस उत्पादनिक शेती लोकवस्ती असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी हा प्रकल्प रद्द करावा अन्यथा आमचे ठाणे शहरात पुनर्वसन करावे आमच्या आरोग्याला धोकादायक असणारा कचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील जनजीवन उध्वस्त करेल आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही आंदोलन उभारून आत्मदहन करू अशा इशाऱ्याचे निवेदन राज्याच्या मंत्र्यांना स्थानिक शेतकरी पंचकोशी संघर्ष समितीचे अध्यक्ष नामदेव शेलार व ग्रामस्थांनी दिले आहे. आतकोली,भादाने,तळवली तर्फे सोनावळे सह अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणाऱ्या महसूल गुरचरण जागेवर 100 वर्षापासून गुरांना चारा उपलब्ध होतो ग्रामपंचायतीचा अधिकार असणाऱ्या जमिनी ग्रामपंचायतचा ग्रामसभा ठराव न घेता ठाणे महानगरपालिकेला महसूल विभागाने दिल्याने जमीन घोटाळा उघड झाला आहे.

      कचरा प्रकल्पामुळे परिसरामधील लगतच्या गावकरी शेतकऱ्यांचा विकासाला खिळ बसणार असून गुरांचा चारा नष्ट होणार आहे. ठाण्याची संपूर्ण घाण आमच्या पथ्यावर कशासाठी मुख्यमंत्री स्वतःच्या शहराचा विचार करताना त्यांना ग्रामीण भागातील लाखो शेतकरी रहिवासांच्या आरोग्याची शेती विकासाची काळजी नसल्याने येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करून दुसरा रोजगार उपलब्ध करून प्रकल्प उभारावा कचरा प्रकल्पामुळे परिसरात रोगराई पसरेल परिसरातील शेती पिण्याचे पाणी दूषित होईल परिसरातील जनावरांना चारा मिळणार नाही परिसराच्या उद्योग व्यवसायांना खेळ बसेल सर्वत्र दुर्गंधी पसरेल स्थानिकांच्या रोजगारावर अन्याय होईल परिसरातील लोकांचा स्थलांतर होईल अशा समस्या असून शासनाने पुन्हा जमीन ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी अशी मागणी केली आहे.

No comments