माळशेज घाटात गाजतय लाकडाचा पूल बांधकाम विभागाचे अधिकारी अपयशी गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी बांधला दगडाच्या बुरुजावर लाकडी पूल...!
नामदेव शेलार / मुरबाड : दगडाला ही देव मानलं तर त्याचा पाठबळ श्रद्धेने अखंड सहवासात राहून जीवन प्रवास सुकर होतो असाच अनुभव अति दुर्गम भागातील फागुळगव्हाण परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आला आहे जीवनाचा खडतर मार्ग सुकर करताना शिक्षण घेण्यासाठी जिद्द हवी असते अशी जिद्द मुरबाड मोरोशी फांगुळगव्हण येथील मोरोशी आश्रम शाळेमधील 80 विद्यार्थ्यांनी नदी पार केली आहे. मुरबाड तालुका राज्याच्या राजकारणातला सत्ताधीन तालुका ज्या पक्षाचा मुरबाडला आमदार येतो त्या पक्षाची राज्यात सत्ता येते तसा हुळ भुल हाव भावाचा लोकप्रतिनिधित्व समजल्या जाणाऱ्या तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांनी दरवर्षी हजार कोटीची विकास कामे केल्याची गणना करून शासनाचा निधी खर्च केला मात्र त्यांच्या हातून फांगुळगव्हाण नदीवरचा पूल राहून गेला सीतेचा माहेरघर ऋषीमुनींचा वास्तव्य छत्रपतींचा प्रवास आणि हुतात्मांची भूमी असलेला निसर्गरम्य माळशेज घाटातील जगाच्या नोंदीत कायमचा कोरलेला लाकडाचा पूल त्याला दगडाचे बुरुज पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची रिंग लागली आहे.
जगात अनेक तांत्रिक पूल विविध व्यवस्थेने उभे केले असतील परंतु मुरबाडच्या आदिवासी विद्यार्थ्यांनीआणि गावकरी यांनी प्रचंड जोराने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात शाळेत जाण्यासाठी दगडाचे बुरुज उभे करून लाकडाचा पूल उभा केलेला पाहिला नसेल तो पूल मुरबाड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात साकारलेला आहे मुरबाड शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर वाड्या वस्त्या अंधारात रस्ते पूल विविध समस्याग्रस्त आहेत येथे सर्व सुविधांचा अभाव आहे फांगुळगव्हाण गावांमधील शेजारील 80 शालेय विद्यार्थी गावकरी महिला पुरुष वृद्ध रुग्ण लहान मुले रात्रंदिवस याच हिफाजत पुलावरून धोकादायक प्रवास करतात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या शाखा अभियंता,उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी कार्यालयात हजर न राहता कोटी रुपयाची विकास कामांचा निधी खर्च केला.
परंतु फांगुळगव्हाणचा निधी पळू सोनावळे नाणेघाटात फिरवून आदिवासी वाड्यांचा पूल कागदोपत्रीच राहिला स्वातंत्र्याच्या 77 वर्षात चाललेले मीशान चूल मूल हुळ गुल आजही गोरगरिबांच्या भावनांशी खेळ खेळण्याचा राजसत्ता कार्यक्रम सुरू आहेत. मुरबाडच्या आदिवासी भागात केंद्र आणि राज्य सरकारने हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आदिवासी 50 टक्के भागात केंद्र सरकारच्या वृक्ष लागवडीपासून गॅस सिलेंडर पर्यंत दिलेल्या योजना फेल ठरल्या राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याच नाहीत मात्र याच परिसरात देशाच्या राष्ट्रपती राज्यपाल यांच्या पाहूलखुणा योजना माध्यमातून कार्यक्रम उत्साहातून लागल्या आहेत अशा मुरबाड तालुक्यात दगडाचे बुरुज लाकडाचा पूल गाजतोय...!
मुरबाड माळशेज घाटात येणारे पर्यटकांची पाऊल फांगुळगव्हाण पूल कसा पाण्यावर तरंगतो हे पाहण्यासाठी सरकली आहेत. गेली अनेक वर्ष येथील गावकरी शालेय विद्यार्थी पावसाळ्यात नदीच्या प्रवाहातून मोरोशीकडे शाळा कॉलेज बाजारपेठा रानमेवा विक्री यासाठी प्रवास करतात परंतु किती दादा मामा आप्पा भाऊ येऊन गेले त्यांना डसलेला बुरुज त्यावरील लाकडाचा पूल दिसला नाही छोटेसे साकव बनवावं वाटलं नाही हे तेथील आदिवासी वस्त्यांचे दुर्दैव आहे. नदीला साकव किंवा पूल बांधण्यास स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती खासदार आमदार अशा लोकप्रतिनिधींना अपयश आलं त्याचवेळी गावकऱ्यांनी जिद्द केली हनुमतानी राम राम दगडावर लिहून लंका दहन केली होती शेतू तयार केला होता.
आपणही सीतेच्या माहेर घरामधील आहोत आपणही प्रत्येक दगडाला आपलंसं करून त्याचा बुरुज तयार करू त्यावर लाकड टाकून सेतू पूल तयार करू वाहाता वाहाता जाण्यापेक्षा जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेऊ त्यातूनच फांगुळगव्हणचा लाकडी पूल उभा राहिला आहे. जेव्हा सामान्यांना स्वार्थासाठी गृहीत धरून ठेकेदार अधिकाऱ्यांना समर्थकांना बळ देणाऱ्याचा याच पुलावरून प्रवास होईल त्याचवेळी आपलं जीवन आपलं शिक्षण सार्थकी लागेल अशाच लाजिरवाणी फांगुळगव्हाण पुलाची कहाणी सोशल मीडियावर वायरल होत आहे पर्यटकांची दगडाचे बुरुजावर उभा राहिलेला लाकडाचा पूल पाहण्यासाठी रिंग लागली आहे गरीबाच्या भावनाशी खेळणारे सरकार निवडणुकीचे बाशिंग बांधणारे मतलबी हुलबाज आता आदिवासी मुलांच्या शिक्षणाशी खेळ खेळतात की उशिरा सुचलेला शहाणपणाचा खेळ खेळतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments