माळशेज घाटात भीषण अपघात तीन तरुण ठार तीन गंभीर जखमी
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड माळशेज घाटातील बोराडे फाटा येथे एका झाडाला अर्टीका कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तीन तरुण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माळशेज घाट रस्ता वैशाखरे पासून मढ पर्यंत वेडी वाकडी वळणाचा असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत संरक्षण भिंती खसलेल्या आहेत दरडी कोसळत असून घाटातील मंजूर रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही गेल्या वर्षी थीदवी येथे मोठ्या थाटामाटात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले परंतु घाटामध्ये गतवर्षी काहीही काम झाले नाही परिणामी वाहन चालक प्रवासी पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कल्याण कडून माळशेज घाटाकडे जाणाऱ्या आर्टिका कार च्या चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळली त्या भीषण अपघातात वरप येतील अश्विन भोईर, प्रतीक चोरगे,नरेश म्हात्रे यांचा मृत्यू झाला असून कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत एर्टिगा कार क्रमांक MH 05 EA 1993 हिचा चक्काचूर झाला आहे माळशेज घाटात पावसाळ्यात अनेकांचा अपघातात बळी गेला आहे.
माळशेज घाटाचा रस्ता चौपदरीकरणासाठी शासनाने लक्ष वेद्यावे अशी येथील स्थानिकांची मागणी आहे. मुरबाड कल्याण चौपदरी रस्ता संत गतीने सुरू आहे माळशेज घाटाकडे जाणारा वैशाखरेपासून मढ पर्यंत रस्त्यामध्ये वेडी वाकडी वळणे अरुंद रस्ता आहे रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन देखील रस्त्याचे काम सुरू झालेले नाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष वेधणार असा सवाल केला जात आहे.
No comments