web-banner-lshep2024

Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली विनापरवाना शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये दहशतीने दगड मातीचे उत्खनन करणाऱ्या घटनास्थळाचा तलाठ्यांनी शासनाला पाठवला बोगस पंचनामा शेतकरी आत्मदहन करणार...!

गौरव शेलार / ठाणे : पडघा विभागातील तलाठी सजा आमने मंडळ अधिकारी पडघा मौजे भादाने आत कोली येथील सर्वे नंबर 172/1 मधील स्थानिक शेतकऱ्यांच्या हिस्सा मालकी जमिनीत विनापरवाना दगड खदान चालवणाऱ्या व चौकशी अंति कारवाईचे आदेश ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भिवंडी तहसीलदार कार्यालयातून आमने तलाठी संजीव धोत्रे यांना घटनास्थळी स्थळ पाहणी पंचनामा फोटो तसेच खदान चालवणाऱ्यांनी परवानग्या घेतल्या आहेत अगर कसे असा लेखी आदेश असताना तलाठी संजीव धोत्रे यांनी दगडखान चालक-मालकाच्या संगणमत आणि खोटा अहवाल पाठवला आहे. 172/1 मधील स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला हरकत घेऊन जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी भूमी अभिलेखा मार्फत मोजणी करून न्याय द्यावा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आत्मदहन करावे लागेल याची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची असेल असे म्हटले आहे. 

     पैसा राजकीय पाठबळाच्या जोमावर गरीब शेतकऱ्यांवर दहशत माजवून स्थानिक शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नाही खुलेआम दगड मातीची वाहतूक करून चोरी केली आहे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री महोदयांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करून नुकसान भरपाईची मागणी केली असता त्याची चौकशी सुरू आहे ठाणे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या चौकशी आदेशापत्रानुसार 172 /1 तसेच गुरचरण जमिनीवरील अवैध दगड खाणीचा पंचनामा करण्याचा आदेश दिला असताना तलाठी आमने यांनी घटनास्थळी 72 हजार 483 ब्रॉसचे उत्खनन झाल्याचे पंचनाम्यात म्हटले असून परवानग्या तहसीलदारांना परस्पर सादर करणार असल्याचे तलाठ्यांनी पंचनाम्यात लिहून जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

     पंचनाम्यावर दगड खाणीवर काम करणाऱ्या कामगारांच्या पंच म्हणून सह्या असून पंचनामा दीड तास केल्याचे नमूद आहे त्यामध्ये दगडखानाची लांबी रुंदी चुकीची दाखवून 172/1 सर्वे नंबरची हिस्सा मोजणी झाली नसताना हिस्साचा क्षेत्र तलाठ्यांनी कोणत्या पुराव्याने ठरविले 172/1 मधील क्षेत्राचा ताजमेल बसत नसल्याने वाढीव क्षेत्र रद्द झाले आहे. त्या दाव्याला जिल्हाधिकारी कार्यालयात स्टे ऑर्डर असताना 172/1 सर्व्हे नंबर मध्ये दगड खाणी उत्खनन परवानग्या कोणी दिल्या ब्लास्टिंग वायरी आजही पुरावे देत असताना तलाठ्यांनी पंचनामा खदान मालकाच्या म्हणण्यानुसार बनवला आहे तो खोटा आहे.

No comments