Jaya Bachchan : 'तुमचा टोन योग्य नाही...", राज्यसभेतच राजदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जुंपली
Jaya Bachchan : राज्यसभा सभापती जगदीप धनखड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जय बच्चन यांच्यात खडाजंगी झाली आहे. जगदीप धनखड यांची बोलण्याची पद्धत खटकल्याने जया बच्चन यांनी राज्यसभेत उघड नाराजी व्यक्त केली. यावरुन सभापती जगदीप धनखड यांनी देखील जया बच्चन यांना खडसावलं. जगदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात जुंपल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
राज्यसभेत
राजदीप धनखड यांनी जया बच्चन यांचं भाषण करण्यासाठी नाव पुकारलं. त्यावेळी
जया बच्चन यांनी म्हटलं की, "मी एक कलाकार आहे. देहबोली आणि हावभाव मला
चांगले समजतात. मला माफ करा, मात्र तुमचा बोलण्याचा टोन योग्य नव्हता. ते
मला मान्य नाही."
जया बच्चन यांच्या टिप्पणीनंतर जयदीप धनखड हे देखील संतापले. "तुम्ही
यशाचं शिखर गाठलं आहे. तुम्हाला माहीत आहे की एका अॅक्टरला डायरेक्टरची गरज
असते. तुम्ही माझ्या टोनवर प्रश्न उपस्थित करत आहात. मी हे सहन करणार
नाही. तुम्ही सेलिब्रिटी आहात. तुम्ही सभापतींनचा अवमान करत आहात." जयदीप धनखड बोलत असताना विरोधकांना सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ सुरु
केला. विरोधी पक्षांनी 'दादागिरी नही चलेगी' म्हणत सभात्याग केला. धनखड
यांनी म्हटलं की, "तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पळत आहे. तुम्हाला चर्चेत
सहभागी व्हायचं नाही."
No comments