web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये ग्राहकांची लूट की दुकानदाराची गुंडगिरी? ‘VM COLLECTION’ विरुद्ध मुरबाड पोलिसात तक्रार नोंद

 

मुरबाड :  मुरबाड शहरातील म्हसा रोडवरील ‘विएम कलेक्शन’ या कपड्यांच्या दुकानाबाबत ग्राहकांकडून गंभीर तक्रारी समोर येत असून, या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. कपडे खरेदी केल्यानंतर बिल मागितल्यास दमदाटी केली जाते, तर कपड्यांमध्ये त्रुटी आढळल्यास ते बदलण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनाहीधमकी देऊन अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे आरोप तक्रारदारांनी केले आहेत.मुरबाड पोलिसांनी दुकानदाराला पावती देऊन विषय संपवण्यास सांगितले असता मी कोणालाच पावती देत नाही अशी माहिती पोलीस स्टेशन मध्ये दिल्याने नाईलाजाने पोलिसांनी तक्रार दाराच्या पुरव्या नुसार गुन्हा दाखल केला आहे

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दुकानातून कपडे खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी बिलाची मागणी केली की दुकानदार कडून आक्रमक भूमिका घेतली जाते. ग्राहकांशी अर्वाच्य भाषा वापरणे, अंगावर धावून जाणे आणि धमकावण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारच्या वर्तनामुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ग्राहकांनी स्वतःच्या पैशाने वस्तू खरेदी केल्यानंतरही त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कपडे खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा कपडा बदलण्याची आवश्यकता असल्यास ग्राहक दुकानात परत जातात. मात्र, तक्रारदारांच्या आरोपानुसार, कपडे बदलण्यासाठी गेलेल्या ग्राहकांशी उद्धटपणे वागले जाते आणि त्यांची समस्या सोडवण्याऐवजी त्यांना हिणवले जातेअंगावर धावून धमकी दिली जाते . त्यामुळे ग्राहकांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संबंधित कपड्यांच्या दुकानाने नगरपंचायतीकडून आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुकानाच्या व्यवसायासंबंधी आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि नियमांचे पालन यांची प्रशासनाने पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, परवानग्यांबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दुकानात ग्राहकांना धमकावण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती ठेवल्या जात असल्याचा आरोपही तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक असून, प्रशासनाने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.ग्राहकांना बिल देण्याची व्यवस्था, कपडे बदलण्यासंबंधी नियम आणि ग्राहकांशी होणारे व्यवहार यांची तपासणी संबंधित विभागांनी करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुरबाडच्या बाजारपेठेत ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होणार का? ‘विएम कलेक्शन’विरोधातील तक्रारींची नगरपंचायत आणि संबंधित प्रशासन दखल घेणार का? याकडे आता मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.मुजोर दुकानदाराला वाचवण्यासाठी काही मधेंस्ती पोलिसांवर दबाव आणल्यास तक्रार दार ग्राहक न्यायलयात दाद मागतील परंतु पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई करावी अशी मांगणी होत आहे

No comments