दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अखिल भारतीय वंजारी समाजाचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द!
गौरव
शेलार / मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त जनता आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या
सामाजिक बांधिलकीतून अखिल भारतीय वंजारी समाजाच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री
ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, शंकर आव्हाड, ज्ञानेश्वर
धात्रक, अर्जुन डोमाळे, रामनाथ दौंड,
वसंत आव्हाड, आत्माराम फड, निवृत्ती घुगे, अखिल भारतीय वंजारी समाज कल्याण
शाखेचे अध्यक्ष रवींद्र आव्हाड यांच्यासह वंजारी समाजातील ज्येष्ठ नेते आणि विविध
क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री
आदिती तटकरे, कृषिमंत्री भरणे मामा, नरहरी
झिरवाळ यांच्यासह अन्य मान्यवरांचीही उपस्थिती होती.
विशेष
म्हणजे, ही महत्त्वपूर्ण भेट
घडवून आणण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी पुढाकार
घेतल्याबद्दल अखिल भारतीय वंजारी समाजाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त
करण्यात आले.दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना आणि जनतेला
मदतीचा हात देण्यासाठी समाजाने घेतलेला हा पुढाकार सामाजिक एकोपा आणि सामाजिक
उत्तरदायित्वाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.



No comments