web-banner-lshep2024

Breaking News

सिलिंगच्या कामासाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप; मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार मनोज म्हात्रे नामक व्यक्ती विरोधात नागरिकांची तक्रार

 

मुरबाड : सिलिंगच्या कामासाठी पैसे घेऊन काम पूर्ण न केल्याचा तसेच फसवणूक केल्याचा आरोप एका नागरिकाने मनोज म्हात्रे नामक व्यक्तीवर केला आहे. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदारांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुरबाड पोलीस ठाणे काय कारवाई करणार, याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज म्हात्रे नामक व्यक्ती हे बोटकुंडले चाळ, देवगाव मुरबाड परिसरात राहत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. सिलिंगच्या कामासंदर्भात पैसे दिल्यानंतर फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या प्रकरणाची योग्य चौकशी करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या कामांसाठी कोणालाही पैसे देताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. संबंधित व्यक्तीची माहिती, कामाचे स्वरूप, ठरलेली रक्कम आणि व्यवहाराचा पुरावा यांची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन तक्रारदारांनी नागरिकांना केले आहे. तसेच, संबंधित व्यक्तीला काम देताना सावधगिरी बाळगावी, असेही त्यांनी म्हटले आहे.आता या तक्रारीची मुरबाड पोलीस ठाणे दखल घेऊन चौकशी करणार का? तक्रारदाराला न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


No comments