मुंबई विमानतळावरील कथित अनधिकृत मशिदीविरोधात किरीट सोमय्यांचा ‘जेल भरो सत्याग्रह’!
मुंबई : मुंबई विमानतळाच्या
टर्मिनल-२ येथील टॅक्सी पार्किंग परिसरात असलेली कथित अनधिकृत मशीद हटविण्याच्या
मागणीसाठी भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभरहून अधिक
कार्यकर्त्यांनी ‘जेल भरो सत्याग्रह’ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह
विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित बांधकामाला विरोध
दर्शवत घोषणाबाजी केली. तसेच, या प्रकरणातील मोहम्मद सरवर यांना अटक
करण्याची मागणी करण्यात आली. विमानतळ परिसरातील कथित अनधिकृत बांधकामावर
प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, सहार पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या
कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. काही वेळानंतर त्यांची सुटका
करण्यात आली.
या आंदोलनात विनायक कामत, ज्ञानमूर्ती शर्मा,
दीपक दळवी, केशरबेन पटेल, प्रकाश मुसळे, युवराज मोरे, चंद्रकांत
माळकर, करण सिंह, प्रशांत ठाकूर
यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विमानतळ परिसरातील कथित
अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला असून,
याप्रकरणी संबंधित प्रशासन काय भूमिका घेते, याकडे
आता लक्ष लागले आहे.



No comments