web-banner-lshep2024

Breaking News

आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून पंतप्रधान मोदींच्या जनसेवेला आमदार किसन कथोरे यांचे अभिवादन

 

गौरव शेलार / बदलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर येथील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आणि ऊर्जावान जीवनासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासात राष्ट्रसेवा, देशहित, विकास आणि जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत देशाला प्रगतीच्या नव्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना आणि सेवा पोहोचविणे हीच खरी जनसेवा असल्याची भावना यावेळी आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली.

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांत होत असलेल्या कामांचा उल्लेख करत आमदार कथोरे यांनी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रसेवेच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास आणि जनकल्याणाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

 

No comments