web-banner-lshep2024

Breaking News

पंतप्रधान मोदी-आमदार कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर-बोराडपाड्यात वृक्षारोपण

 

गौरव शेलार / बदलापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वन परिक्षेत्र, बदलापूर यांच्या सौजन्याने बदलापूर-बोराडपाडा येथील जैवविविधता उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार किसान कथोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विकासाची वाटचाल करताना निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे घटक नाहीत, तर भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहेत. विकसित भारताच्या संकल्पासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा संकल्प आपण केला पाहिजे,” असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

पुढील पिढ्यांसाठी हिरवाईने नटलेला, स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली, तरच पर्यावरण संवर्धनाचा हा संकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

No comments