web-banner-lshep2024

Breaking News

एकरी एक लाखांचा बयाना अन् कोट्यवधींचा जमीन व्यवहार? एचके दलाल कुठला;खोटे दस्तऐवज तयार करणाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा

 

नामदेव शेलार / ठाणे :  आतकोली-भादाणे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या व्यवहारावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या एक लाख रुपयांचा बयाना रक्कम मोबदला देऊन जमिनीचे दस्तऐवज तयार करण्यात आले असल्याने येतील शेतकरी जमीन दलाल यांचा सोध घेत आहेत. या व्यवहारामागे नेमका कोणाचा पुढाकार होता, जमिनी कोणाच्या नावाखाली एमओए करण्यात आले आणि पुढे कोणत्या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आला याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 आतकोली भादाणे तळवली अर्जुनली पडघा या परिसरात गोडाऊन प्रोजेक्ट्स साठी गोयल नावाने एचके आणि काही जमीन एजन्ट जमीन गोळा करत असून गेल्या दोन वर्षां पासून शेतकरी यांना बोलावून ठाणे येते कोणत्या तरी आलिशान इंटरप्राइजेसचे ऑफिस मध्ये जमीन कागद पत्र तयार केले असून हा जमीन घोटाळा कोटी रुपयाचा असल्याची चर्चा आहे.मात्र सातबारावर अनेक नांवे असल्यामुळे बयाना घेणारे-देणारे रॅकेट कुठला आहे.त्याना जमीन कशी मिळणार अशी चर्चा पडघा परिसरात सुरु आहे.

या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विशेषतः संबंधित जमिनींसाठी एमओए कोणाच्या नावाने करण्यात आले, कोणत्या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार झाले आणि प्रत्यक्षात किती रुपयांची उलाढाल झाली, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

 

एच.के.च्या पुढाकाराची गुप्त माहिती असल्याची चर्चा!

 

दरम्यान मुरबाडमधील एच.के.’ नावाच्या व्यक्तीचा या संपूर्ण जमीन व्यवहारात पुढाकार असल्याची गुप्त माहिती असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.शेतकऱ्यांशी झालेल्या व्यवहारात या व्यक्तीची भूमिका काय होती? संबंधित एमओए, जमीन व्यवहार आणि कंपन्यांशी त्यांचा नेमका संबंध काय? याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित व्यक्तीची नेमकी भूमिका तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात केवळ चर्चांवर न थांबता कागदपत्रे, एमओए, जमीन नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचा सवाल थेट आहे जर जमिनीचा मोबदला लाखांच्या घरात असेल, तर पुढे या जमिनींच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली का? संबंधित व्यवहारात नेमकी किती रक्कम फिरली? कोणत्या कंपनीच्या नावाने व्यवहार झाले? आणि या संपूर्ण व्यवहाराचा आर्थिक स्रोत काय होता? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.जमिनींच्या व्यवहारात खोटे किंवा दिशाभूल करणारे दस्तऐवज तयार झाले असतील, तर ते कोणी तयार केले आणि कोणाच्या फायद्यासाठी तयार केले. येते कोणता प्रकल्प होत आहे त्यासाठी जमिनी खरेदी केल्या जात आहेत याचाही तपास व्हावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या प्रकरणातील प्रत्येक कागदपत्र, एमओए, कंपनीचे नाव, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार तपासले गेले तरच एक लाखांच्या मोबदल्यापासून कोट्यवधींच्या व्यवहारापर्यंतचा कथित प्रवास स्पष्ट होऊ शकतो.आता शेतकऱ्यांची मागणी एकच संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा आणि सत्य जनतेसमोर आणा. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनींच्या व्यवहारात अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय द्या.मात्र कोणत्याही प्रकल्पा साठी शेतकरी जमिनी देणार नाहीत येतील सावकार आणि कुळाचा प्रश्न बाकी असताना जमिनी खरेदी बाजार मांडणाऱ्यांना शेतकरी येथून हाकलून लावतील असा इशारा दिला आहे


No comments